शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: जन्माच्या २० मिनिटांनंतर डान्स करतोय हत्तीचा पिल्लू; व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:27 IST

हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगात व्हायरल होत आहे. या एका हत्तीचं पिल्लू जन्मानंतर २० मिनिटांमध्ये जमिनीवर उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली – अलीकडेच केरळमधील गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अन्न दिल्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. मुक्या जनावराला असं निर्दयीपणे मारल्याने माणुसकीवर शंका उपस्थित झाली. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र सध्या सोशल मीडियात असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.

हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगात व्हायरल होत आहे. या एका हत्तीचं पिल्लू जन्मानंतर २० मिनिटांमध्ये जमिनीवर उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओ आपण पाहू शकता की, यात हत्तीणी पुढे चालत आहे तर मागे हत्तीणीचं पिल्लू डान्स करत आहे.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, हे हत्तीचं पिल्लू २० मिनिटांपूर्वी जन्मलेलं आहे. या नव्या जगात आल्याबद्दल तो किती आनंदी झाला आहे हे डान्स करताना दिसून येतं. या पायांनी आता त्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो जणांनी या व्हिडीओला लाईक्स केला आहे.

काही दिवसांपूर्वी केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. अननस खाल्यानंतर हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. सदर घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. हत्तीणीच्या मृत्यूबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी देशभरातील लोकांनी केवळ शोक व्यक्त केला नाही, तर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. यानंतर याप्रकरणी केरळ पोलिसांनी एका आरोपीस अटक केल्याची माहिती केरळचे वनमंत्री के. राजू यांनी दिली. तर, आणखी संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल