सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिव्हिल लाईन्स रोडवरील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी संध्याकाळी एक मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आगामी व्हॅलेंटाईन डेनिमित्त आपल्या कथित प्रेयसीसोबत खरेदीसाठी आलेल्या पतीला पत्नीने रंगेहात पकडले. यानंतर मॉलमध्येच दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन मॉलमध्ये शॉपिंग करत होता. त्याच वेळी त्याची पत्नी तिथे पोहोचली. पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच पत्नीचा संयम सुटला आणि तिने जाब विचारण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पतीने दोन्ही महिलांना तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली, जिचे रूपांतर काही वेळातच शारीरिक हाणामारीत झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकींना मारहाण करताना, ओरडताना आणि चक्क चावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
हा राडा सुमारे १५ मिनिटे सुरू होता, ज्यामुळे मॉलमध्ये आलेल्या इतर ग्राहकांमध्ये घबराट पसरली. शेवटी मॉलमधील कर्मचारी आणि काही उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून दोन्ही महिलांना एकमेकांपासून वेगळे केले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. रॉबर्ट्सगंज कोतवालीचे प्रभारी निरीक्षक रामस्वरूप वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.
सोशल मीडियावर चर्चा
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी वैयक्तिक वादांचे सार्वजनिक प्रदर्शन झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Web Summary : In Sonbhadra, a wife caught her husband shopping with his girlfriend, leading to a public fight in a mall. The husband fled, and the women physically fought. Police complaint filed; video goes viral.
Web Summary : सोनभद्र में एक पत्नी ने अपने पति को गर्लफ्रेंड के साथ शॉपिंग करते पकड़ा, जिससे मॉल में सार्वजनिक लड़ाई हो गई। पति भाग गया, और महिलाओं ने मारपीट की। पुलिस में शिकायत दर्ज; वीडियो वायरल।