शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्यारवाली लव्हस्टोरी! भाजीवाल्याच्या प्रेमात पडली फिलीपिन्सची तरुणी, भाषेचा अडथळा होता पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:44 IST

परदेशातून एक मुलगी चक्क तिच्या प्रेमासाठी थेट भारतात आली.

आजकाल आपण सोशल मीडियावर अशा अनेक लोकांशी जोडलेलो असतो, ज्यांच्यासोबत कधीही न भेटता एक खास नातं तयार होतं. सोशल मीडियावरील मैत्रीचं रुपांतर खऱ्या प्रेमात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक हटके लव्हस्टोरी समोर आली आहे. परदेशातून एक मुलगी चक्क तिच्या प्रेमासाठी थेट भारतात आली.

गुजरातमधील एका भाजी विक्रेत्याची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणी त्याच्यावरच्या प्रेमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात पोहोचली.फेसबुकवरून भाजीविक्रेत्याची तरुणीशी ओळख झाली. नंतर मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांच्यामध्ये भाषेचा अडथळा होता. पिंटू आणि फिलीपिन्समधील या मुलीने बहुतेकदा इमोजी आणि व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

पिंटूने सांगितलं की, त्याला इंग्रजी नीट बोलता येत नव्हतं, पण मुलीच्या स्मितहास्याने सर्व काही सांगितलं. त्याच वेळी, या मुलीला पिंटूचा साधा स्वभाव, दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा इतका आवडला की तिने तिच्या मनाचं ऐकलं आणि गुजरातला येण्याचा मोठा निर्णय घेतला. या अनोख्या लव्हस्टोरीने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर "storiyaan_" नावाच्या अकाउंटवरून ही लव्हस्टोरी शेअर करण्यात आली आहे.

एके दिवशी पिंटूने मुलीला एक पार्सल पाठवलं, ज्यामध्ये एक खास भेट होती. याद्वारे त्याने तिला प्रपोज केलं. जेव्हा मुलीने व्हिडिओ कॉलवर पार्सल उघडलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच होकार दिला, पण त्यानंतरही दोघेही दोन वर्षे वेगळे राहिले. त्यानंतर पिंटू फिलीपिन्सला गेला आणि मुलीच्या कुटुंबाला भेटला. त्याचा साधा आणि प्रामाणिक स्वभाव पाहून कुटुंबालाही तो आवडू लागला. अखेर दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न केलं. 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल