शाहिद कपूरच्या कबीर सिंगचा ट्रेलर आल्यापासूनच हवा तयार झाली होती की, शाहिदचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार. झालंही तसंच. शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टिका होत असली तरी सुद्धा या सिनेमाची गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स फेमस झाले आहेत. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत.
'कबीर सिंग' ने बॉक्स ऑफिसवर कमवला मोठा गल्ला अन् सोशल मीडियात मीम्सचा कल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 14:43 IST