Trending Video: सोशल मीडिया हा एक असा प्रकार ज्यामुळे जग खूपच जवळ आले आहे. पूर्वी आपल्यापासून ५० किलोमीटरवर काय घडतंय, हे लोकांना माहिती नसायचे. पण आता सोशल मिडीयामुळे आपल्यापासून ५०० किलोमीटर अंतरावर कानाकोपऱ्यात घडलेली छोटी गोष्टही पटकन आपल्याला कळते. याचे कारण म्हणजे सोशल मीडियाचा वाढता वापर. या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सोशल मीडिया एखाद्या लोकप्रिय व्यक्तीला क्षणात बदनाम करू शकतो तर एखाद्या सामान्य व्यक्तीला सेलिब्रिटी करू शकतो. सध्या अशाच एका परदेशी मुलीची भारतात चर्चा रंगली आहे. मूळची उब्जेकिस्तानची असलेली रोबिया हावासगुरूही ( robiya havasguruhi) सध्या भारतीय युवांच्या चर्चेचा विषय आहे. जाणून घेऊया त्यामागचे कारण.
बॉलिवूड हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. बॉलिवूडची हिंदी गाणी केवळ भारतातच आवडत नाहीत तर ती आता जगभरात आपली छाप सोडत आहेत. अनेक देशांचे लोक ही हिंदी गाणी शिकतात, गातात सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. रोबिया देखील अशीच एक मुलगी आहे. तिचा आवाज खूप मधुर आहे. तिचे गाणे ऐकल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही की ती भारतातील नाही, कारण तिचे शब्द भारतीय गायकासारखेच ऐकू येतात. सध्या तीचा नवा व्हिडीओ चर्चेत आहे. त्यात ती म्हणते 'मी भारतीय नाहीये, पण...' आणि त्यानंतर गाणे सुरू करते. पाहा व्हिडीओ-
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या 'गुरु' चित्रपटातील 'तेरे बिना' हे गाणे तिच्या सुंदर आवाजात गाताना दिसते. या गीताला ए.आर. रहमान यांनी चित्रपटात संगीत दिले आहे. या परदेशी मुलीनेही तिच्या सुंदर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर robiya_havasguruhi नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.