Trending Video: सोशल मीडियावर दररोज काही ना व्हायरल होत राहते. आता फारुखाबादमधील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पत्नीने गुप्तांगावर हल्ला केल्याचा दावा व्हिडिओतील तरुण करत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
फरुखाबादेतील महिलेने आपल्या पतीच्या गुप्तांगावर हल्ला केला. यानंतर पीडित पतीने रडत-रडत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. संदीप असे या तरुणाचे नाव असून, तो रात्री झोपेत असताना पत्नी रंजना हिने त्याच्या गुप्तांगावर अचानक हल्ला केल्याचे त्याने व्हिडिओत सांगितले. सुदैवाने या घटनेत त्याचा जीव वाचला. पोलीस आपले ऐकत नसल्याचा दावाही त्याने केला आहे.
त्याला या हल्ल्याचे कारण विचारले असता, पत्नीचे अनेक पुरुषांशी संबंध असून, ती मला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा दावाही संदीपने केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काहीजण तरुणाला सहानुभूती देत आहेत, तर काही लोक विनोद करत आहेत. @gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी पाहिला आहे.
सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले... पत्नी विनाकारण कोणाच्याही प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत नाही. आणखी एका यूजरने लिहिले... पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण आहे.