Kanpur Samosa Girl Viral Video: सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक जण आपली प्रतिभा दाखवण्यास उत्सुक असतो. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण सोशल मीडियावर एखादी व्हिडीओ किंवा एखादा फोटो व्हायरल झाल्यास, तो झटपट अख्ख्या जगात पोहोचतो. पण काहीवेळी काही आश्चर्यचकित करणारे व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. ते व्हिडीओ दुसरे लोक शूट करतात आणि पोस्ट करतात. कानपूरमधील असाच एका तरुणीचा थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'कानपूर समोसा गर्ल' म्हणून प्रसिद्ध झालेली शिखा कश्यप चक्क उकळत्या तेलात हात घालून पकोडे तळताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी आणि प्रत्यक्ष पाहणारे ग्राहकही अवाक झाले आहेत.
नेमका प्रकार काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, शिखा कश्यप मिरचीचे पकोडे तळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, कढईतील तेल पूर्णपणे तापलेले असून त्यातून वाफा येत आहेत. अशावेळी तेलात पकोडे बाहेर काढण्यासाठी ती कुठल्याही झाऱ्याचा वापर न करता शिखा थेट उकळत्या तेलात हात घालून पकोडे काढते. व्हिडिओमध्ये एका ग्राहकाने खात्री करण्यासाठी त्या पकोड्यांना स्पर्शही केला, त्यावेळी त्याला मात्र चटका बसला. त्यामुळे तेल खरोखरच उकळते असल्याचे सिद्ध झाले. पाहा व्हिडीओ
कोण आहे शिखा कश्यप?
शिखाचे वडील गेल्या ३५ वर्षांपासून समोसे आणि पकोड्यांचा ढेला (टपरी) चालवत आहेत. तिनेही नंतर वडिलांच्या या पारंपरिक व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या अजब कौशल्यामुळे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तिचे १ लाख २० हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. शिखाला उकळत्या तेलाचा चटका का लागत नाही, हे एक गूढच आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आणि पकोड्यांची चव चाखण्यासाठी कानपूरमध्ये तिच्या दुकानावर मोठी गर्दी होते.
Web Summary : Shikha Kashyap, known as 'Kanpur Samosa Girl,' is going viral for frying pakoras in boiling oil with her bare hands. Customers are shocked as she fearlessly uses no utensils. Her unique skill has gained her over 120,000 followers.
Web Summary : शिखा कश्यप, 'कानपुर समोसा गर्ल' के नाम से मशहूर, उबलते तेल में अपने हाथों से पकोड़े तलने के लिए वायरल हो रही हैं। ग्राहक दंग हैं क्योंकि वह निडरता से किसी बर्तन का उपयोग नहीं करती है। इस अनोखे हुनर ने उन्हें 120,000 से अधिक फॉलोअर्स दिलाए हैं।