शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाची कल्पना! ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी तरुणीने बुक केले हेलिकॉप्टर, किराया फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:24 IST

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तरुणीने लढवलेली अनोखी शक्कल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

फक्त भारतातच नाही, तर जगभरात अनेक मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. या शहरांच्या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचेही नाव येते. आता याच शहरातून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रचंड ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी एका भारतीय वंशाच्या तरुणीने वेगळाच जुगाड लावला. तिने विमानतळावर जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर बुक केले. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी सुरी नावाच्या तरुणीला मॅनहॅटनहून जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचे होते. तिला माहित होते की, रस्त्यात तिला प्रचंड ट्रॅफिक लागणार आहे, त्यामुळे तिने चक्क उबेरद्वारे (Uber) हेलिकॉप्टर राईडचा पर्याय निवडला. तुम्ही म्हणाल की, हा वेडेपणा आहे. पण खुशीने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिला हेलिकॉप्टरसाठी जास्त पैसे खर्च करावे लागले नाही.

हेलिकॉप्टर आणि कॅबचे भाडे खुशीने एक्सवर उबेर कॅब आणि हेलिकॉप्टरच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ यांची तुलना करणारा स्क्रीनशॉट टाकला आहे. या माहितीनुसार, उबेर कॅब राइडचे अंदाजे भाडे $131.99 (म्हणजे 11,023.47 रुपये) होते. पण, याद्वारे तिला विमानतळावर पोहोचण्यासाठी एक तास लागला असता. तर, मॅनहॅटन ते विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरचे भाडे 165 डॉलर (13780.39 रुपये) होते. याद्वारे ती अवघ्या पाच मिनिटांत विमानतळावर पोहोचणार होती.

या दोघांच्या भाड्यात फारसा फरक नव्हता, त्यामुळेच खुशीने चक्क हेलिकॉप्टर बुक केले. खुशीच्या या पोस्टमुळे इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढ्या कमी किमतीत हेलिकॉप्टर राईडचा पर्यायही उपलब्ध आहे, हे पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल