शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चोराने तरूणीची बॅग लुटली, बॉयफ्रेंड एकटीला सोडून पळाला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:17 IST

Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक अविश्वसनीय घटना दिसत आहे. ज्यात दोन चोर बाईकवरून आले. त्यांनी तरूणीकडील बॅग घेतली, पण काही वेळातच परत केली. चला जाणून घेऊ कारण...

Robbers Return Handbag To Girl: रस्त्यावर चोरी-लुटमारीच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. चोर येतात आणि लोकांकडील वस्तू हिसकावून पळून जातात. पायी चालणारे जास्तीत जास्त लोक या चोरांचे शिकार होतात. पण चोरींच्या काही अजबही घटना समोर येतात. काही दिवसांआधी समोर आलं होतं की, एक चोर चोरी करण्यासाठी गेला आणि महिलेच्या प्रेमात पडला. आता त्याहून एक वेगळी घटना समोर आली आहे. एका चोराने तरूणीकडून बॅग हिसकावली, पण एका कारणाने त्याचं मन बदललं आणि त्याने तिला बॅग परत केली.

एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक अविश्वसनीय घटना दिसत आहे. ज्यात दोन चोर बाईकवरून आले. त्यांनी तरूणीकडील बॅग घेतली, पण काही वेळातच परत केली. चला जाणून घेऊ कारण...

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी एका तरूणासोबत रस्त्यावरून चालत आहेत. मागून दोन चोर बाईकवरून येतात. बाईकवरील एक चोरी जसा तरूणीजवळ जातो आणि तिला धमकावतो. तिच्यासोबत असलेला तरूण घाबरतो आणि तरूणीला एकटी सोडून तिथून पळून जातो. चोर तिच्याकडील बॅग घेतो आणि पळून जाणार इतक्या थांबतो. तरूणी आपल्या पळून गेलेल्या बॉयफ्रेंडकडे बघत असते.

तरूणाचं हे वागणं पाहून चोरही हैराण होतो आणि त्याला तरूणीवर दया येते. चोर तरूणीसोबत संवाद साधत असल्याचं दिसतं. दरम्यान मन बदलल्याने चोर तरूणीला तिची बॅग परत देतो. असंही दिसत आहे की, चोरांनी जाण्याआधी तरूणीला काहीतरी सल्लाही दिला. 

कॅपिटान गरूफा द्वारे ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलं नाही. पण ही घटना शेजारच्या इमारतीमधील कॅमेरात कैद झाली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल