शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातून पृथ्वीवर होत असलेल्या 'सूर्योदया'चा अलौकिक नजारा, व्हिडीओ बघून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:21 IST

Viral Video : सोशल मीडियावर अंतराळातून सूर्योदय कसा दिसतो, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत हा मनमोहक नजारा पाहून लोक थक्क झाले आहेत.

Viral Video : सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा बघण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात. अंतराळातून सूर्योदय आणि सूर्यास्त बघणं हा कदाचित जगातील सगळ्यात अद्भुत नजारा ठरू शकतो. हेच लोकांचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर अंतराळातून सूर्योदय कसा दिसतो, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत हा मनमोहक नजारा पाहून लोक थक्क झाले आहेत.

व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पसरत जात आहे. सूर्याची पहिली किरण वायुमंडलाला स्पर्शून निळा आणि केशरी नजारा तयार करते. सोबतच पांढरे ढगही दिसत आहेत. हा नजारा इतका सुंदर आहे की, जणू स्वर्गातील नजारा आहे. लोकांच्या मनाला हा व्हिडीओ इतकी शांतता देत आहे की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. 

सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सगळ्यांनाच मनमोहित केलं आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तसेच शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया देऊन या अनुभवाबाबत सांगितलं आहे. बऱ्याच लोकांनी नजारा स्वर्गातील असल्याचं म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ @wonderofscience अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांची अंतराळातून पृथ्वी बघण्याची ईच्छा पूर्ण झाली आहे. हा व्हिडीओ त्यांना आनंद देणारा ठरत आहे. मात्र, या व्हिडिओत करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी लोकमत करत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके