शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आइस्क्रीम खाणार इतक्यात दिसला गोठलेला साप, फोटो बघून लोक 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:41 IST

Snake in Ice cream : थायलॅंडमधील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये चक्क पूर्ण साप आढळला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Snake in Ice cream : पार्सल बोलवण्यात आलेल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये कधी पाल तर कधी झुरळ, कधी अळ्या तर कधी उंदीर आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर हद्दच झाली. कारण थायलॅंडमधील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये चक्क पूर्ण साप आढळला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेबन नाकलेंगबून असं या व्यक्तीचं नाव असून त्यानं फेसबुकवर याचे फोट पोस्ट केले आहेत. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं की, "इतके मोठे डोळे. खरंच तो मृत आहे ना? ब्लॅक बीन, आइस्क्रीम विक्रेता. ओरिजनल फोटो. कारण ही मी स्वत: खरेदी केली आहे".

ब्लॅक बीन हा आइस्क्रीमचा एक प्रकार असून थायलॅंडमध्ये लोक ही आवडीनं खातात. याच आइस्क्रीमध्ये व्यक्तीला साप आढळून आला. याचे फोटो त्यानं फेसबुकला शेअर केले. ज्यात बघू शकता की, आइस्क्रीममध्ये एक काळ्या आणि पिवळ्या रंगाचा साप गोठलेला आहे. सापाचं तोंडही स्पष्ट दिसत आहे. फोटो पाहून काही सोशल मीडिया यूजर्सनी अंदाज लावला की, हा एक कमी विषारी गोल्डन ट्री स्नेक (क्रिसोपेलिया ऑर्नाटा) असू शकतो. गोल्डन ट्री स्नेक सामान्यपणे ७० ते १३० सेमीपर्यंत लांब असतात. पण आइस्क्रीममध्ये आढळलेला साप एक पिल्लू होता, जो २० ते ४० सेमी लांब होता.

फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंवर लोकांनी हजारो कमेंट्स केल्या आहेत. ज्यात लोकांनी हे धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "याच कारणानं आम्ही रस्त्यावरील स्टॉलवरून काहीच घेत नाही". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "ठीक आहे, तुम्हाला आइस्क्रीमसोबत थोडं एक्स्ट्रा प्रोटीन मिळत आहे". तिसऱ्यानं लिहिलं की, "पहिला घास तुम्हाला चांगला लागेल, दुसऱ्या घासानंतर तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवर असाल".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके