शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 19:23 IST

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे.

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे. स्टुडिओमध्ये लाइव्ह शो सुरू असताना एका पत्रकारावर भलामोठा टेलिव्हिजन सेट कोसळला. या घटनेत पत्रकार जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर विविध स्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा स्टुडिओत उपस्थित सर्व सहकारी आश्चर्यचकीत झाले आणि एकच गहजब उडाला. 

टेलिव्हिजन चॅनल ईएसपीएन कोलंबियासाठी (ESPN Colombia) काम करणाऱ्या कार्लोस ओर्डूज (Carlos Orduz) याला या घटनेनंतर किरकोळ जखम झाली आहे. कार्यक्रमावेळी स्टेडिओमध्ये सहा जण उपस्थित होते. त्याचवेळी एका पत्रकाराच्या डोक्यावर मागून टेलिव्हिजनचा भलामोठा सेट पडला. टेलिव्हिजन इतका मोठा होता की तो पत्रकार त्या सेटखाली पूर्णपणे अडकला गेला. 

जखमी पत्रकारानं ट्विटरवर सांगितली घटनाटेलिव्हिजन कोसळून जखमी झालेल्या पत्रकारानं वैद्यकीय चाचणीनंतर त्याच्या नाकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. ओर्डूज यांनी स्पॅनीश भाषेत ट्विट केलं आहे. "ज्यांनी माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आणि माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आता पूर्णपणे ठीक आहे. देवाच्या कृपेनं माझ्या सर्व चाचण्या व्यवस्थित आल्या आहेत आणि फक्त नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. धन्यवाद", असं ट्विट ओर्डूज यांनी केलं आहे. 

व्हिडिओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूजटेलिव्हिजन चॅनलच्या स्टुडिओमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ तब्बल १५ लाख वेळा पाहिला गेला आहे. त्यास ११ हजार लोकांनी लाइक केलं आहे आणि ३३२९ लोकांनी तो शेअर केला आहे.  

टॅग्स :Journalistपत्रकारSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय