शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

अतिशहाणपणा नडला! खिडकीतून ST मध्ये चढण्यासाठी तरुणाची धडपड; चौकटीसह आला खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:05 IST

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

Social Viral : महाराष्टाची जीवनवाहिनी म्हणजे लालपरी. लाल डब्बा, एसटी तसेच लालपरी अशा नानाविध नावांनी ती ओळखली जाते. गावागावातून, खेड्यापाड्यातून गेली कित्येक वर्षे तिचा प्रवास चालू आहे. लालपरीचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाल परवडणारा असल्यामुळे ग्रामीण भागात लोकांची सर्वाधिक पसंती एसटीला मिळते. वाढत्या लोकसंख्येमुळे गावाकडेही आता एसटीची सेवा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची एकच झुंबड पाहायला मिळते. एसटीमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी लोकांची मोठी धडपड सुरू असते. केवळ सीटसाठी प्रवाशांची मोठी तारेवरची कसरत चालू असते. सध्या सोशल मीडियावर याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक विद्यार्थ्यी एसटीमध्ये बसायला सीट मिळावी यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न करताना दिसतो आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्यामुळे दरवाज्यातून आपल्याला जाता येणार नाही, यासाठी सीट पकडण्यासाठी त्याने ही अनोखी युक्ती केली. खिडकीतून एसटीमध्ये घुसण्याचा त्याचा हा प्रयत्न फसला आहे. खिडकीच्या साहाय्याने एसटीमध्ये तो विद्यार्थी चढण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या वजनामुळे तो खिडकीच्या चौकटीसह जमिनीवर धाडकन कोसळतो. त्याच एसटी स्टॅंडवर असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. सदर व्हिडीओ हा महाराष्ट्रातील बीड येथील असल्याचा सांगण्यात येत आहे.

Rohit Dhende @avaliyapravasi या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर प्रवाशाला धडा मिळावा म्हणून खुश व्हावं की एसटीची काच पडली म्हणून दु:खी असं कॅप्शन यूजरने दिलं आहे.

नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "असे काही आगाऊ विद्यार्थी असतातच सगळीकडे..आशा आहे अद्दल घडली असेल" अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूजरने "विद्यार्थीच एसटी बसचं नुकसान करतात, हे बऱ्याच निरक्षणाअंती दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे" .

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBeedबीड