उकळत्या तेलात हात घालून दुकानदारानं केलं चिकन फ्राय; व्हिडीओ पाहून सारेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:44 AM2021-11-09T11:44:06+5:302021-11-09T11:44:19+5:30

उकळतं तेल असलेल्या कढईत हात घालून बाहेर काढलं चिकन फ्राय

street food vendor dips his hand in boiling hot oil while making fried chicken video viral | उकळत्या तेलात हात घालून दुकानदारानं केलं चिकन फ्राय; व्हिडीओ पाहून सारेच हैराण

उकळत्या तेलात हात घालून दुकानदारानं केलं चिकन फ्राय; व्हिडीओ पाहून सारेच हैराण

Next

उकळत्या तेलात हात घालून चिकन फ्राय करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कढईत उकळत्या तेलात टाकलेलं चिकन ही व्यक्ती हातानं काढत आहे. रस्त्याशेजारी चिकन फ्राय विकणाऱ्या व्यक्तीचा कारनामा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जयपूरमधील फूड ब्लॉगर शैलेशनं रस्त्याजवळ चिकन फ्राय विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत २० लाखाहून अधिक लोकांना पाहिला आहे. हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये जयपूरच्या अली चिकन सेंटरमध्ये काम करणारा विक्रेता चिकन फ्राय करताना दिसत आहे. विक्रेत्यानं मॅरिनेट करण्यात आलेलं चिकन आधी कढईतील उकळत्या तेलात सोडलं. चिकन व्यवस्थित तळल्यानंतर विक्रेत्यानं उकळत्या तेलात हात घालून ते बाहेर काढलं. विशेष म्हणजे विक्रेत्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही. त्याहून व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. 

अशा प्रकारचे व्हिडीओ याआधीही समोर आले आहेत. इंडोनेशियातील महिला उकळत्या तेलात हात टाकून जेवण करताना दिसत आहे. गरम तेलात हात टाकून भज्या काढणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओदेखील काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्या तेलाचं तापमान १२० डिग्री सेल्सिअस होतं.

Web Title: street food vendor dips his hand in boiling hot oil while making fried chicken video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.