वसई - छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून वसई किल्ल्यावर फोटो काढणाऱ्या युवकाला परप्रांतीय सुरक्षा रक्षकांनी रोखले. हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाने युवकाला फोटो काढण्यास मज्जाव केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून शिवप्रेमींनी यावर संताप व्यक्त केला आहे. शिवकालीन इतिहासात वसईच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याच किल्ल्यावर छत्रपतींच्या वेषातील युवकाला फोटो काढण्यास रोखल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने या युवकाशी वाद घातला. मराठीत नाही तर हिंदीत बोला असं सुरक्षा रक्षकांनी म्हटले. रुपेश हुलावले असं या युवकाचे नाव आहे. हा युवक इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांवर कंन्टेंट बनवतो. त्याच निमित्ताने तो वसई किल्ल्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता. मात्र तिथे परप्रांतीय सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले आणि तिथे वाद निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषिक आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडूनही होत आहे.
नेमकं काय घडलं?
मी वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत फोटो काढायला गेलो होतो. तिथे मंदिरातील गुरुजी होते, त्यांनी मला ओळखले, स्थानिकांनी मला पाठिंबा दिला. परंतु जेव्हा मी किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा तिथे कुणी बाटल्या घेऊन जात होते. कुणी गुटखा खात होते. हे वॉचमॅनला दिसले नाही. मात्र मी छत्रपतींच्या वेशात तिथे गेलो ते त्या सुरक्षा रक्षकांना खटकले. आमच्याशी वाद घातला असता चालले असते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणी बोलले तर मनाला लागले. ए सब बंद करो अशा मुजोरी भाषेत ते बोलत होते. आमचा कॅमेरामॅन फोटो काढत होता, तो घाबरला. ते आमच्याशी हिंदीत बोलत होते. आम्ही मराठीत बोललो तर हिंदी मै बात करो, मराठी नही आती असं त्यांनी म्हटलं असं रुपेश हुलावले याने म्हटलं.
प्रत्येकाला आपापली भाषा आवडते, मला माझी मराठी भाषा आवडते. माझ्या दैवताला, माझ्या भाषेला मी माझ्या राज्यात जपत असेल तर हा गुन्हा आहे का? तुम्ही बाहेरून येत असाल, १०-१० वर्ष इथं राहून आमच्यावर मुजोरी भाषा वापरत असाल, मराठीत बोलणार नाही, हिंदीत बोला असं जबरदस्ती करणार असाल तर हे आम्ही खपवून घेत नाही. जे फालतुगिरी करत होते, त्यांना सुरक्षा रक्षक अडवत नव्हते. मी सुरुवातीला हिंदीत बोललो, परंतु तो जोरजोरात बोलायला लागला. मी मराठीत बोललो तेव्हा मुझे नही आता वैगेरे बोलत राहिला असंही रूपेश हुलावले याने सांगितले.
Web Summary : A youth dressed as Shivaji Maharaj was stopped from taking photos at Vasai Fort by a security guard, sparking outrage. The guard insisted on Hindi, leading to a language dispute and demands for action.
Web Summary : वसई किले में शिवाजी महाराज के वेश में एक युवक को सुरक्षा गार्ड ने फोटो लेने से रोका, जिससे आक्रोश फैल गया। गार्ड ने हिंदी पर जोर दिया, जिससे भाषा विवाद हुआ और कार्रवाई की मांग उठी।