आई तर आई असते...तिचे प्रेम अनमोल असते. आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी ती सिंहाशीही लढते. एकच आई आहे जी मुलांवर कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करते. आईचे प्रेम आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही पण तिला अनुभवल्यावर आपले डोळे नक्कीच पाणावतील. आईच्या ममतेची अशीच एक सुंदर गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी ऐकून अनेकजण भावूक झाले. खरं तर, एक आई २४ वर्षे एकाच ताटात जेवायची. आईच्या मृत्यूनंतर मुलाला जेव्हा यामागचे रहस्य कळले तेव्हा त्याचे डोळे भरून आले. त्याने ही गोष्ट जगासोबत शेअर केली, जी आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.
या थाळीची गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल!हा फोटो विक्रम (@vsb_dentist) या युजरने १९ जानेवारी रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ही अम्माची थाळी आहे. तिने गेल्या दोन दशकांपासून यामध्ये जेवण केले आहे. ती एक छोटीशी थाळी होती, ज्यामध्ये ती तिच्याशिवाय फक्त मला आणि चुलबुलीला (श्रुती, माझी भाची) जेवायला देत असे. तिच्या मृत्यूनंतर, मला माझ्या बहिणीकडून या प्लेटचे महत्त्व किंवा त्याचं रहस्य कळलं. खरं तर, मी ही थाळी सातवीत बक्षीस म्हणून जिंकली होती असं त्याने सांगितले.
या गोष्टीनं सोशल मीडियावरील यूजर्स भावूक झाले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी म्हटलं की आई अशीच असते. तर काहींनी आईच्या प्रेमापुढे इतर सर्व प्रेम फिके पडते असं म्हटलं. एक यूजर म्हणाला की हे फक्त आईच करू शकते. त्याच वेळी, काहींनी आईबाबतचे किस्से शेअर केलेत. जगात फक्त आईच तुमच्यावर कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम करते, अशी कमेंट एकाने केलीय.