शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Video: अगडबम अजगराचा रस्ता रोखून मुलीने केलं असं काही, बघून फुटेल घाम....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:58 IST

Snake Viral Video : सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच अनेक लोकांना घाम फुटतो. अशात जर कुणाला दुरूनही साप दिसला तर लोक पळून जातात.

सोशल मीडिया असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे बघून अनेकदा अंगावर काटा येतो. तर काही व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसू लागतात. अशातच एक अशा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघून काही मिनिटांसाठी दंग व्हायला (Snake Viral Video) होतं. कारण या व्हिडीओत एक लहान मुलगी भल्यामोठ्या अजगरासोबत खेळताना दिसत आहे. अर्थातच हे बघून कुणालाही धक्काच बसेल.

सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच अनेक लोकांना घाम फुटतो. अशात जर कुणाला दुरूनही साप दिसला तर लोक पळून जातात. पण या चिमुकल्या मुलीची हिंमत बघून तुम्हाला नक्कीच झटका बसेल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मुलगी आरामात बसली आहे आणि समोर एक खतरनाक अजगर येतो. या अजगराला बघून मुलगी अजिबात घाबरत नाही. उलट ती त्याचा रस्ता अडवते. पण सापालाही राग येत नाही.

अशाप्रकारचा नजारा कदाचित तुम्ही कधी पाहिला नसेल. दोघांचं ट्यूनिंग बघून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'snake._.world' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ९० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर मजेदार प्रतिक्रियाही देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया