शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टवॉच बनलं 'हेर'! एका नोटिफिकेशनने केली पतीच्या अफेअरची पोलखोल; विद्यार्थिनीवर होतं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:02 IST

एका छोट्या नोटिफिकेशनने सुखी संसारात वादळ आणलं.

आजच्या डिजिटल जगात एखादं गुपित लपवणं दिवसागणिक कठीण होत चालले आहे. मोबाईल, एप्स आणि स्मार्ट गॅजेट्स कधी कोणाचं सत्य समोर आणतील, हे सांगता येत नाही. मलेशियातील २१ वर्षीय इन्फ्लुएन्सर नूरिन लोफा हिच्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ज्या पतीला नूरिनने प्रत्येक संकटात साथ दिली, तोच आपली फसवणूक करेल असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. याचा धक्कादायक खुलासा स्मार्टवॉचने केला. त्या एका छोट्या नोटिफिकेशनने तिच्या सुखी संसारात वादळ आणलं.

मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी नूरिनच्या पतीच्या फोनवर एक मेसेज आला, ज्याचं नोटिफिकेशन त्याच्या स्मार्टवॉचवर आलं. कुतूहलापोटी नूरिनने जेव्हा तो मेसेज पाहिला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. स्मार्टवॉचमध्ये पती आणि दुसऱ्या एका महिलेमध्ये अत्यंत रोमँटिक आणि आक्षेपार्ह चॅटिंग सुरू होतं. मेसेजमध्ये निमनेमचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे नूरिनचा संशय खात्रीत बदलला. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यानेच विश्वासघात केल्याचं पाहून तिला मोठा धक्का बसला.

नूरिन लोफाने सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त करताना सांगितलं की, ती एक विद्यार्थिनी आहे. हा खुलासा नूरिनसाठी मोठा धक्का होता. तिने सांगितलं की, जेव्हा पतीकडे चांगली नोकरी नव्हती आणि लोक त्याच्यावर टीका करायचे, तेव्हा ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. माझा पती 'फूड डिलिव्हरी रायडर' आहे आणि तो कष्टाने कमावून खातो असं नूरिन अभिमानाने सांगायची. पण त्याच पतीने तिचा विश्वासघात केला. व्हायरल व्हिडिओमध्ये नूरिनने त्या मुलीला जाहीर आव्हान दिलं असून तिच्या पालकांपर्यंतही हे पोहोचवलं आहेत.

नूरिनने स्पष्ट केलं आहे की, आता ती गप्प बसणार नाही, कारण तिच्यासोबत तिचा लहान मुलगाही आहे. राग आणि दुःख व्यक्त करत तिने पतीवर कडक शब्दांत टीका केली. पतीच्या दबावामुळे तिने नंतर काही पोस्ट डिलीट केल्या खरं, पण आता हे प्रकरण कायदेशीर वळणावर पोहोचलं असून दोघेही कोर्टात गेले आहेत. नूरिनने सांगितलं की, सध्या घरातील वातावरण थोडं शांत झालं असलं तरी मनातील कडवटपणा संपलेला नाही. तिने आपल्या मुलाचा फोटो शेअर करून त्याची माफी मागितली आणि त्याला वडिलांची उणीव भासू देणार नाही, अशी शपथ घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Smartwatch reveals affair: Wife discovers husband's infidelity via notification.

Web Summary : A smartwatch notification exposed a Malaysian woman's husband's affair with a student. Despite her support during his struggles, he betrayed her. Heartbroken, she publicly confronted him and the other woman, vowing to fight for her child despite the betrayal.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया