Girls Fight Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. भांडणांचे व्हिडीओ तर पाहता पाहता व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. कधी भांडणं रस्त्यावर सुरू असतात, तर कधी बसमध्ये. त्यातल्या त्यात तरूणी आणि महिलांच्या भांडणांचे व्हिडीओ तर अधिक गाजतात.
सद्या तरूणींच्या खतरनाक भांडणाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झााला आहे. ज्यात तरूणींचे दोन ग्रुप एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहे. शाळकरी मुलींच्या भांडणांचे असे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.
इन्स्टाग्रामवर @_.palshab._ नावाच्या हॅंडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अनेक शाळकरी मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तर शाळेतील इतर अनेक मुलं-मुली हा तमाशा बघत उभे आहेत.
व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं की, पाच ते सहा मुली एकमेकींना चक्क बेल्ट आणि हाताने हाणामारी करत आहेत. तेच गोल बनवून उभे असलेले बाकीची शाळकरी मुलं भांडणाच्या मधे जाऊन डान्सही करत आहेत.
व्हिडिओत असं दिसत आहे की, मुलींमधील भांडण शाळेच्या बाहेर कुठेतरी सुरू आहे. तसेच तिथे उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचे गणवेशही वेगवेगळे दिसत आहेत. यादरम्यान काही मुलं मजा घेताना आणि डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.