Saudi Arabia Sky Stadium Reality: सौदी अरेबिया २०३४ मध्ये फिफा विश्वचषक आयोजित करणार आहे. फिफा विश्वचषकाबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत. सौदी अरेबिया जगातील पहिले स्काय स्टेडियम बांधण्याची तयारी करत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. निओम नावाचे हे स्टेडियम जमिनीपासून ३५० मीटर (१,१५० फूट) उंच असेल, असेही सांगितले जात आहे. NEOM प्रकल्पाचा भाग म्हणून सौदी अरेबिया जगातील पहिले स्काय स्टेडियम बांधत असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, या आकाश मैदानात अंदाजे ४६,००० प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असेल. याबाबत सत्य काय, जाणून घेऊया.
व्हिडिओमध्ये किती तथ्य?
जर आपण या दाव्यांमधील सत्य पाहिले तर ते काल्पनिक आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ, ज्यामध्ये स्काय स्टेडियम दाखवले आहे, तो प्रत्यक्षात कोणत्याही अधिकृत डिझाइनचा भाग नाही. हा एक संगणक-निर्मित संकल्पना व्हिडिओ आहे, जो सौदी अधिकाऱ्यांनी जारी केलेला नाही किंवा फिफानेही मान्यता दिलेली नाही.
वास्तव काय आहे?
सौदी अरेबिया प्रत्यक्षात NEOM प्रकल्पात एक स्टेडियम बांधत आहे, जे अंदाजे 350 मीटर उंच असेल, परंतु व्हायरल प्रतिमांनुसार ते गगनचुंबी इमारतीच्या वर बांधले जात नाहीये. हे NEOM स्टेडियम देशाच्या महत्त्वाकांक्षी द लाईन प्रकल्पाचा भाग असणार आहे. त्यामुळेच हे स्टेडियम एखाद्या इमारतीच्या वरच्या भागात असेल हा दावा खरा नाही.
AI व्हिडिओ कोणी तयार केला?
ऑनलाइन फिरणारा व्हिडिओ कोणत्याही अधिकृत सौदी एजन्सीने तयार केलेला नाही किंवा शेअर केलेला नाही. ही एक डिजिटली जनरेट केलेला व्हिडीओ आहे. डेली मेलच्या मते, व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात ब्रिटिश डिझायनर लियाम हॉवेस यांनी काही मिनिटांत तयार केला होता. हा एक एआय-जनरेटेड व्हिडिओ होता. ईस्ट ससेक्स येथील ३४ वर्षीय हॉज एक छोटी मीडिया कंपनी चालवतो आणि एआय डिझाइन टूल्स वापरून प्रोजेक्ट्स तयार करतो. त्याने हा AI व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला.
अखेर स्पष्टीकरण आलं...
अखेर, लियामने स्पष्ट केले की त्याने बनवलेल्या व्हिडीओचा सौदी अरेबिया किंवा फिफाशी कोणताही संबंध नाही. त्याने डेली मेल स्पोर्टला सांगितले की व्हिडिओ तयार करण्यासाठी फक्त दोन किंवा तीन मिनिटे लागली. तथापि, गोंधळ निर्माण झाला कारण सौदी अरेबिया प्रत्यक्षात निओममध्ये एक भव्य स्टेडियम बांधत आहे. खरे निओम स्टेडियम अंदाजे 350 मीटर उंच असेल आणि ते द लाइन नावाच्या भविष्यकालीन स्मार्ट सिटीमध्ये बांधले जाईल.
Web Summary : A viral video claiming Saudi Arabia is building a 'Sky Stadium' for the 2034 FIFA World Cup is false. The video is AI-generated and unrelated to official plans. While NEOM project includes a stadium, it's not a skyscraper stadium as depicted.
Web Summary : सऊदी अरब द्वारा 2034 फीफा विश्व कप के लिए 'स्काई स्टेडियम' बनाने का दावा करने वाला एक वायरल वीडियो झूठा है। वीडियो एआई-जनरेटेड है और आधिकारिक योजनाओं से असंबंधित है। NEOM परियोजना में एक स्टेडियम शामिल है, लेकिन यह वायरल वीडियो जैसा नहीं है।