महाकुंभमध्ये आपल्या सुंदर डोळ्यांनी मोनालिसा नावाच्या तरुणीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. मोनालिसा आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील कुंभमेळ्यात माळा विकायला आली आहे. तिचे डोळे आणि सौंदर्य पाहून अल्पावधीच ती खूप लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर मोनालिसाचे फोटो आणि व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत आहेत. अनेक इन्फ्यूएन्सर आणि यूट्यूबर तसेच स्थानिक मीडिया सतत तिचा पाठलाग करत आहेत.
मोनालिसाला तिच्या लग्नाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल विचारलं जात आहे. मुलाखती मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. मोनालिसा म्हणते की, तिला अभिनेत्री व्हायचं आहे. जर तिला संधी मिळाली तर ती अभिनेत्री होईल. आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक युट्यूबर विचारत आहे की, तुला कोणत्या फिल्म स्टारकडून लग्नाची ऑफर आली आहे का? तर यावर मोनालिसा म्हणते हो, सलमान खान.
जर तुला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर तू करशील का? असा प्रश्नही यूट्यूबरने विचारला. त्यावर मोनालिसा हो म्हणते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण खरंतर हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसाचा मेकओव्हर करण्यात आला. 'व्हायरल गर्ल'च्या मेकओव्हरचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेकअपनंतर मोनालिसाला ओळखणं अवघड झालं आहे. शिप्रा मेकओव्हर ब्युटी सलूनने तिचा मेकओव्हर केला. मोनालिसाच्या सर्व व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत.