शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Video: रशियन तरूणीसोबत दिल्लीच्या 'इंडिया गेट'समोर भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:37 IST

Russian girl Bhojpuri song dance video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात

Russian girl Bhojpuri song dance video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. आजकाल लोक सार्वजनिक ठिकाणी नाचू लागतात, गाणं गायला सुरुवात करतात. मग या कृतीमुळे इतरांची किती गैरसोय होऊ शकते याचा ते विचारही करत नाहीत. नुकतेच एका भारतीय तरुणाने असेच केले. मात्र या कृत्यात एका परदेशी तरुणीनेही त्याला साथ दिली. सध्या या तरुण-तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Russian woman dance viral video). दिल्लीतील इंडिया गेटसमोर उभे राहून त्यांनी भोजपुरी गाण्यावर डान्स केला आहे.

इंस्टाग्राम युजर @harsh_tivari_dancer अनेकदा त्याच्या ३ लाख फॉलोअर्ससाठी विविध नृत्याचे व्हिडिओ पोस्ट करत असतो, त्या व्हिडीओचे लोक खूप कौतुक करत असतात. पण काही वेळा तो विचित्र ठिकाणी नाचताना आणि गातानाही दिसतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (Russian girl Bhojpuri song dance video). त्यामध्ये तो इंडिया गेटसमोर एका रशियन मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे.

रशियन तरुणीसोबत डान्स व्हिडीओ-

व्हिडिओमध्ये तरुण विदेशी तरुणीसोबत जोरदार डान्स करत असल्याचे दिसत आहे. दोघेही पवन सिंगच्या राजा जी या गाण्यावर ताल धरत आहेत. जरी तरुणाचा डान्स खूप चांगला आहे, परंतु रशियन मुलगी देखील कोणत्याही बाबतीत त्याच्यापेक्षा कमी दिसत नाही. ती देखील मोठ्या उत्साहात नाचत आहे. तिथून जाणारे लोक दोघांकडेही बघताना दिसत आहेत. नृत्य करणे चांगले असू शकते, परंतु अशा राष्ट्रीय स्मारकांसमोर नाचणे देशाची प्रतिष्ठा कमी करणारे ठरू शकते, असे मत सोशल मीडियावर अनेक लोक व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान, आजकाल प्रसिद्ध होण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग झाला आहे. त्यामुळेच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण त्यासोबतच अनेकांनी कमेंट करून त्यांची प्रतिक्रियाही दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrussiaरशियाSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य