शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:35 IST

एका आरपीएफ जवानाने प्रवाशाचा जीव वाचवून त्याला नवजीवन दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

काही वेळा रेल्वे स्थानकावर अशा घटना घडतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना धडकीच भरते. पण काही लोक असे असतात जे अशा घटनांमध्ये प्रसंगावधान दाखवतात आणि धैर्याने, तत्परतेने इतरांचा जीव वाचवतात. रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे. एका आरपीएफ जवानाने प्रवाशाचा जीव वाचवून त्याला नवजीवन दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

15743 अप फरक्का एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून निघणार होती. सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेन सुरू झाली. तेव्हा ट्रेनमध्ये चढताना एक प्रवाशी अडखळला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकला. हे दृश्य पाहून तेथे उभे असलेले लोक घाबरले, मात्र आरपीएफ जवान होरी प्रसाद यांनी घटनास्थळी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

आरपीएफ पोस्ट डीडीयूचे प्रभारी निरीक्षक प्रदीप कुमार रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल होरी प्रसाद यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. याच दरम्यान ही घटना घडली. एक प्रवासी पडताना दिसताच होरी प्रसाद यांनी आपली चपळाई आणि धैर्य दाखवलं. न डगमगता धावत पडणाऱ्या प्रवाशाला पकडलं. 

ट्रेन आपल्या वेगाने जात होती, मात्र जवानाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेनंतर प्रवाशाला सुखरुप ट्रेनमध्ये बसवण्यात आलं. त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं तपासात निष्पन्न झालं. आरपीएफ जवान होरी प्रसाद यांच्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ व्हायरल होत असून सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल