Yuzvendra Chahal RJ Mahvash Hug Video Viral: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल सध्या केवळ त्याच्या खेळामुळेच नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. त्याचा आणि त्याची गर्लफ्रेंड आरजे महावशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करताना दिसत आहे. युझवेंद्र चहलच्या वाढदिवसासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. बरेच लोक या बर्थडे पार्टीसाठी आले होते. त्या निमंत्रितांमध्ये आरजे महावशचाही समावेश होता. त्यातलाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि महावश बऱ्याच ठिकाणी एकत्र फिरताना दिसले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि इतर अनेक लोकही दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, आधी युझवेंद्र चहल नाचताना दिसतो. त्यानंतर आरजे महावश तेथे येते आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर युजवेंद्र चहल पुन्हा नाचू लागतो. पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-
आणखी वाचा: RJ महावशचं खरं नाव माहितीये का?
महावशने चहलसाठी लिहिली खास पोस्ट
महावशने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चहलचा एक फोटो पोस्ट केला. त्यामध्ये तो एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना महावशने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा युजी! वय वाढणे हा जीवनाचा एक भाग आहे आणि जीवनाचे इतर भाग त्याहूनही वाईट आहेत. तुला खूप साऱ्या शुभेच्छा.'
रिलेशनशिपबाबत युजी काय म्हणतो...
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल अलीकडेच नेटफ्लिक्सच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मा यांच्यासोबत दिसला. यादरम्यान कृष्णा अभिषेक मुलीच्या वेशात आला आणि त्याने युजवेंद्रला भयंकर छेडले. जेव्हा चहलला आरजे महावशच्या नावाने प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, संपूर्ण भारताला रिलेशनशिपबद्दल माहिती आहे.