शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी सुनक यांचा बायोपिक, नेटकऱ्यांनीच केली कास्टिंग; अक्षय कुमारसह या अभिनेत्यांचे नाव आघाडीवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:25 IST

ऋषी सुनक युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा चेहरा अनेकांशी जुळवून मजेशीर मीम्स बनवले जात आहेत.

ऋषी सुनक युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा चेहरा अनेकांशी जुळवून मजेशीर मीम्स बनवले जात आहेत. सोशल मीडिया युजर्स आशिष नेहरापासून अक्षय कुमारपर्यंत, अनेकांशी ऋषी सुनक यांची तुलना करत आहेत. यातच आता सुनक यांच्या बायोपिकची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली असून, नेटकऱ्यांनी यासाठी स्टार्सचीही निवड केली आहे. या लिस्टमध्ये अभिनेता अक्षय कुमारचे नाव आघाडीवर आहे. अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्यामुळे, अनेकदा तो ट्रोल होतो. याशिवाय, एखाद्या भारतीय व्यक्तीने मोठे यश मिळवल्यावरही अक्षय कुमार, त्याचा बायोपिक करणार, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होतात. अशाच चर्चा आता ऋषी सुनक यांच्याबद्दल सुरू झाल्या आहेत. सुनक यांचा बायोपिक आल्यास, अक्षय कुमार त्यांची भूमिका साकारणार, असे मीम्स सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

सोशल मीडियावर अक्षय कुमारचा फोटो ऋषी सुनक यांच्या चेहऱ्याची मिळवून पाहिला जात आहे. याशिवाय, त्याच्या नमस्ते लंडन चित्रपटातील एक मोनोलॉगही(ज्यात तो इंग्लिश लोकांसमोर भारताचे कौतुक करतो) व्हायरल केला जात आहेत. 'द क्राउन' नावाची मालिका राणी एलिझाबेथ II वर आधारित आहे. आता लोक या मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये अक्षय सुनक यांची भूमिका साकारणार, असे म्हटले जात आहे.या दोन अभिनेत्यांचीही नावं आली

अक्षय कुमारसोबतच इतर दोन अभिनेत्यांच्या नावाचीही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या दोन अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जिम सार्भचा समावेश आहे. यांचे फोटोही ऋषी सुनक यांच्या चेहऱ्याची मिळवून पाहिले जात आहेत. विशेष म्हणजे, सुनक पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी क्रिकेटर आशिष नेहराचा चेहरा मिळवून पाहिला गेला आहे. नेहराचा चेहरा सुनक यांच्याशी मिळता-जुळता आहे. दरम्यान, सुनक यांच्या आयुष्यावर बायोपिक बनले की नाही, हे येणाऱ्या काळात कळेल. पण, तोपर्यंत तुम्ही सगळे मीम्सचा आनंद घ्या...

 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकAkshay Kumarअक्षय कुमारSocial Viralसोशल व्हायरल