शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

'शीsss' वाटणारा विषय तितकाच महत्त्वाचा; वाचा 'फ्लश कमोड' निर्मितीची 'टॉयलेट गाथा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:55 IST

वाढत्या गुडघेदुखीमुळे तसेच बैठ्या कामांमुळे भारतीय आबालवृद्धांना इंग्रजी शौचालय पद्धत अंगवळणी पडली आहे. तिचा निर्माता आणि त्यामागील कथा वाचा!

>>  डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

मध्यंतरी समाजमाध्यमात सदरहू पुणेरी पाटी बघितली आणि पटकन हसू आलं...''आता हेच बघायचं राहिलं होतं” असं क्षणभर वाटलंही पण ‘विज्ञानप्रेमी’ मनात चटकन कुतूहलही चाळवलं..

थोड्या वेळापुर्वी ज्यावर तुम्ही बसला होतात त्या कमोडपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी संस्कृतीला एक दोन नाही तब्बल हजारो वर्षे लागलीत..

हे ‘पुरावे’ नष्ट करण्याचा प्रयत्न जगात सर्व प्रथम कुणी केला असेल याच्या खोलात गेल्यानंतर कळलं हे तर आपल्या भारतातच चार हजार वर्षांपूर्वी झालंय..

मोहेंजदडो-हडप्पात तर चक्क अगदी व्यवस्थित ड्रेनेज लाईनचे अवशेषही सापडलेत अर्थात ही शौचालयेच वाटत असली तरी याबद्दल अजूनही सुस्पष्ट मत नाही त्यामुळं पहिलं शौचालय तयार करण्याचा मान एक तर तीन हजार वर्षांपूर्वीच्या निओलिथिक वसाहतीतल्या स्कॅाट्स किंवा ग्रीक लोकांना जातो ज्यांनी ख्रिस्तपूर्व १७०० साली नॉसॉसची गढी बांधली होती..

इथं पाण्याच्या पुरवठ्याला जोडलेलं मोठं मातीचे भांडं शौचालय म्हणून वापरलं जात असे...साल ३१४पर्यंत रोममध्ये जवळपास १४४ सार्वजनिक शौचालये होती. रोमन लोकांसाठी तर शौचालयात जाणं ही एक सामाजिक जबाबदारी मानली तिथ मित्रांना भेटणं-विचारांची देवाणघेवाण करणं-एकमेकांना माहिती देणं वगैरे चालत असे. सफाई मात्र तिथं लहान लाकडी हँडलला चिकटलेल्या स्पंजच्या तुकड्यानं होत असे. हे हॅंडल नंतर शौचालयासमोर असलेल्या जलवाहिनीमध्ये धुवून पुन्हा वापरण्यात येत असत. एरवीही एखाद्यानं काही घोळ घातला तेव्हा “यानं काठीचं चुकीचं टोक पकडलं” असा वाक्प्रचार यातूनच निर्माण झाला...

मध्ययुगीन काळात इंग्लंडमध्ये लोक भांडं वापरत ज्याला ते ‘पॅाटीज’ म्हणत आणि त्यांची सामग्री चक्क दरवाजा किंवा खिडकीतून रस्त्यावर फेकत असत. काही श्रीमंत लोक ‘गार्डरोब’ नामक व्यवस्थेचा वापर करत..हे म्हणजे खंदकावर बांधलेली छोटीशी खोली. हे नाव बहुधा शौचालयाच्या परिसरात कपडे ठेवण्याच्या प्रथेवरून आलं असावं. पुराव्याची विल्हेवाट करण्यासाठी मात्र मजूर वापरले जात असत..

लंडनमध्ये एक मोठा सार्वजनिक गार्डरोब बांधण्यात आला जो थेट थेम्स नदीत रिकामा केला जाई यामुळं मजूरांची गुलामी संपली पण दुर्गंधी आणि रोगराई मात्र निर्माण झाली. या गार्डरोब आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची जागा अखेरीस कमोडनं घेतली. बसण्यासाठी आसन आणि झाकण असलेला एक डब्बा ज्यामध्ये पोर्सिलेन किंवा तांब्याचे भांडे झाकलेलं असे.

फ्रान्सच्या अकराव्या लुईनं आपला कमोड पडद्याआड लपवला होता तर पहिल्या एलिझाबेथनं आपल्या कमोडला किरमिजी रंगाच्या मखमलीनं झाकलं होतं. आता टॅायलेट फ्रेशनर्स आले पण तेव्हा गंध लपवण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात असे..

१८६० साली थॉमस क्रॅपरने पहिलं फ्लश टॉयलेट डिझाईन केलं असा व्यापक समज असला तरी सोळाव्या शतकादरम्यानच युरोपात आधुनिक स्वच्छतागृह शोधली गेली होती. फ्लश टॉयलेटचा शोध लावण्याचं श्रेय पहिल्या एलिझाबेथचा मानसपुत्र सर जॉन हॅरिंग्टनला जातं. यानं १५९२ साली एक उंच कुंड आणि त्याला जोडून पाईप असलेल्या पाण्याच्या कपाटाचा शोध लावला ज्याद्वारे पाणी फ्लश करण्यासाठी वापरलं जात असे..

या शोधाकडं जवळजवळ २०० वर्षे दुर्लक्ष केलं गेलं १७७५ पर्यंत घड्याळ निर्माता अलेक्झांडर कमिंग्ज यानं दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी टॉयलेटच्या खाली ‘S’ आकाराचा पाईप बसवला. एकोणीसाव्या शतकात ब्रिटनची लोकसंख्या वाढल्यानं शौचालये कमी पडू लागली. लंडन आणि मँचेस्टर सारख्या गर्दीच्या शहरात एकावेळी शेकडो लोकं शौचालय वापरत यामुळं सांडपाणी रस्त्यावर आणि नद्यांमध्ये सांडत असे. यामुळं हे सगळं पुन्हा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात मिसळलं आणि जलजन्य रोगानं हजारो लोक मरण पावले..१९३० ते १८५० या काळात तर कॉलराचा उद्रेकच झाला.

सरतेशेवटी १८४८ साली “प्रत्येक घरात यासाठी व्यवस्था असावी” असं फर्मान काढलं गेलं..घरटी असलेले राखेचे खड्डे रिकामे करण्यासाठी रात्री माणसं येत असत. १८५८ साली विशेषत: उन्हाळ्यानंतर जेव्हा सांडपाणी कुजलं आणि यामुळं प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली तेव्हा सरकारनं लंडनमध्ये गटारांची एक प्रणाली तयार केली. १८६१ साली प्रिन्स एडवर्डनं थॉमस क्रेपर याची राजवाड्यांमध्ये शौचालये बांधण्यासाठी नियुक्ती केली. १८६५ साली सगळं बांधकाम पूर्ण झालं आणि कॉलरा, टायफॉइड आणि इतर जलजन्य रोगांमुळं होणारे मृत्यू अत्यंत कमी झाले..

क्रेपरनं टॉयलेटशी संबंधित अनेक शोधांचे पेटंट घेतले परंतु प्रत्यक्षात आधुनिक टॉयलेटचा शोध लावला नाही. त्यानं पहिलं आधुनिक टॅायलेट प्रदर्शित केलं असलं तरी त्याचे समकालीन जॉर्ज जेनिंग्ज,थॉमस ट्वीफोर्ड,एडवर्ड जॉन्स आणि हेनरी डॅाल्टन यांनीही या संदर्भात एक ना अनेक प्रयोग केले होते. विसाव्या शतकात साधारणत: १९०२ साली व्हॉल्व्ह आले, पाठीमागं विसावलेली पाण्याची टाकी आला आणि पाठोपाठ टॉयलेट पेपरचे रोल्ससह आले. १९९२ साली यूएस एनर्जी पॉलिसी कायदा मंजूर करण्यात आला यानुसार फ्लश टॉयलेटसाठी फक्त १.६ गॅलन पाणी वापरता येईल असा नियम केला गेला..

परिणामस्वरुप यासाठी जगभरातील अनेक कंपन्या या अडथळ्यांना रोखण्यासाठी आणि कमी पाणी-उत्तम फ्लश अशी शौचालये विकसित करण्यासाठी पुढं सरसावल्या. बर्‍याच टॉयलेटमध्ये आता स्वयंचलित फ्लश आहेत यापैकी काही शौचालये उत्पादित कचऱ्याचे कंपोस्ट देखील करतात त्यामुळं त्याचा बागेतील खत म्हणून वापर केला जाऊ शकतो..

आपल्याकडं उत्तम प्रसाधनगृह होती इथंपासून आपल्याकडं डोक्यावर मैला वाहून नेला जाई ते आजही अनेक ठिकाणी लोकं उघड्यावर शौचास जातात हे आपलं वास्तव. सार्वजनिक ठिकाणी फ्लश टॅायलेट विकसित करणारा इंग्लिश सॅनिटरी अभियंता जॅार्ज जेनिंग्ज याच्या स्मृतीदिनी सहज ही टॅायलेट गाथा!

टॅग्स :Healthआरोग्य