शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! घरच्या चंद्रासाठी चंद्रावर तुकडा; पठ्ठ्यानं लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला दिलं स्पेशल गिफ्ट

By manali.bagul | Updated: December 27, 2020 11:39 IST

Trending Viral News in Marathi : माझी पत्नी सपना अनिजा हिच्यासाठी  लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त काही खास करायचे होते म्हणून मी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे.

(Image Credit- ANI, PTI) 

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो. या दिवशी आपल्या  पतीला किंवा पत्नीला खूष करण्यासाठी काय करता येईल याचा विचार सगळेचजण करतात. लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला कोणी चंद्राचा तुकडा दिल्याचे तुम्ही ऐकलंय का? तुमचा विश्वास बसणार नाही पण राजस्थानातून अशीच एक घटना समोर आली आहे. 

राजस्थानच्या अजमेरमधील एका व्यक्तीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला चंद्रावर तीन एकर जमीन भेट म्हणून दिली. धर्मेंद्र अनीजा यांना पत्नी सपना अनिजा हिच्यासाठी  लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त काही खास करायचे होते म्हणून त्यांनी चंद्रावर जमीन विकत घेतली.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना धर्मेंद्र अनीजा यांनी सांगितले की, '' 4 डिसेंबर रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मला तिच्यासाठी काहीतरी विशेष करायचे होते. प्रत्येकजण  गाडी दागदागिने यांसारख्या संपत्ती भेटवस्तू देतात, परंतु मला काहीतरी वेगळे करायचे होते. म्हणूनच मी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली." 

सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान

धर्मेंद्र अनीजा यांनी ही जागा लुना सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून विकत घेतली. धर्मेंद्र अनिजा म्हणाले की, ''संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागलं. मी आनंदी आहे. मला वाटते की मी चंद्रावर जमीन विकत घेणारा राजस्थानातील पहिला माणूस आहे."

सपना अनिजा यांनी सांगितले की,'' की मला आपल्या पतीकडून अशी विशेष "आउट ऑफ द वर्ल्ड" भेट कधीच मिळण्याची अपेक्षा नव्हती. मी अत्यंत आनंदी आहे. मला अशी अपेक्षा नव्हती की तो मला काहीतरी खास देईल. ही पार्टी व्यावसायिक कार्यक्रमाच्या आयोजकांनी आयोजित केली होती. आम्ही अक्षरशः चंद्रावर आहोत. अशी भावना मनात होती. तेथे समारंभाच्या वेळी त्यांनी मला मालमत्तेच्या कागदपत्रांचे एक प्रमाणित प्रमाणपत्र भेट दिले."

जुगाड म्हणून चक्क गाईच्या पोटाला स्क्रिन बनवून सिनेमा बघत बसले; IPS अधिकारी म्हणाले....

शाहरुख खान आणि दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने काही महिन्यांपूर्वी बोधगय्या येथे राहत असलेल्या नीरज कुमारनेही वाढदिवसाच्या दिवशी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली होती. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके