शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेडिअममध्ये तरूणाने लग्नासाठी केलं प्रपोज, बघून तरूणी तेथून पळून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:05 IST

यूएसच्या मॅसाचुसेट्समधील पोलर पार्कमध्ये मायनर लीग बेसबॉल गेमदरम्यानचा एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघेही आपापल्या आवडत्या टीमला चीअर करण्यासाठी आले होते.

अनेक तरूणींची इच्छा असते की, तिला कुणीतरी फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज करावं. तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल की, ज्यात तरूण तरूणीला एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये किंवा लाइव मॅच वेळी प्रपोज करत असतो. ज्यानंतर असे व्हिडीओ व्हायरलही होतात. असाच एक प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या प्रपोज नाकारलं (Proposal gone wrong video) गेलं आहे.

यूएसच्या मॅसाचुसेट्समधील पोलर पार्कमध्ये मायनर लीग बेसबॉल गेमदरम्यानचा एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघेही आपापल्या आवडत्या टीमला चीअर करण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या आवडत्या टीमचे टी-शर्टही घातले होते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तरूण एक अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून तरूणीला लग्नासाठी प्रपोज करतो. लोकही त्यांना बघून त्यांना चीअर करत आहेत. कारण सर्वांनाच हा नजारा भारी वाटला होता. पण अचानक असं काही झालं की, तरूणाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. (हे पण बघा : Funny Video ! मंडपात मुलांनी नवरी-नवरदेवाची उडवली खिल्ली, लोक म्हणाले - लंगूर के हाथ में अंगूर...)

अचानक रोमॅंटिक वाटणारा हा सीन थयानक झाला. कारण तरूणीने तरूणाच्या प्रपोजवर असं रिअॅक्शन दिलं की, जणू तिने भूत पाहिलं असेल. तिच्याकडे पाहून हे दिसून येतं की, या प्रकारामुळे सहज नव्हती. तरूणाने गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केल्यावर तरूणी तेथून पळून जाते. तर तरूण तिच्याकडे निराश होऊन बघत राहतो. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. लोक भरभरून या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. काही लोक म्हणाले की, प्रेम संपलं आहे तर काही लोक तरूणाला योद्धा म्हणत आहेत. अनेकांनी तरूणीवर टीका केली आहे. तेच काही यूजर्स म्हणाले की, तरूणीला प्रपोजल मान्य नव्हतं तर ती स्पष्टपणे नकार देऊ शकली असती. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका