शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Merry Christmas: "मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:23 IST

8 वर्षीय चिमुकलीने सांताक्लॉजला एक भावनिक पत्र लिहले आहे.

नवी दिल्ली : ख्रिसमस जवळ आला आहे आणि यासाठी लहान मुले सांता क्लॉजकडून काही खास भेटवस्तू मागत असतात. बहुतांश मुले त्यांच्या आवडत्या मिठाई, खेळणी इत्यादी मागतात. मात्र आठ वर्षांच्या मुलीने सांताला लिहिलेले हृदयद्रावक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये चिमुकलीने सांताक्लॉजकडे आपल्या आई-वडिलांसाठी पैसे मागितले आहेत. 

हे पत्र शेअर करताना युजरने लिहले, "माझ्या बहिणीला नुकतेच सांताला पाठवलेले हे पत्र सापडले. जे तिच्या 8 वर्षांच्या मुलीने लिहिलेले आहे. एवढी लहान मुलगी या गोष्टीचा विचार करत आहे हे पाहून मला खूप रडू आलं!." या पत्रात 8 वर्षीय चिमुकलीने लिहले की, "प्रिय सांता, या ख्रिसमससाठी मला माझ्या मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवे आहेत. ते बिल भागवण्यासाठी खूप कष्ट करतात. मलाही वाईट वाटते. त्यामुळे प्रिय सॅंटा, तू हे काम करशील का? मी यासाठी दिलगीर आहे सॉरी, एम्मी."

चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र एमीने सांताला लिहिलेल्या पत्रात भावनिक संदेश देण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटिझन्सचे डोळे पाणावले आहेत. एका युजरने म्हटले, "अश्रू आणि सर्व काही. ते आमच्याकडून जगण्याची अपेक्षा कशी करू शकतात हे क्रूर आहे." इतरही सोशल मीडियावरीस युजर्संनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाChristmasनाताळ