शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

चोरीला गेलेला एक पिटबुल, त्याचे सहा दावेदार, त्यात सातव्याची एन्ट्री; पोलिसांनी बिरबलाची ट्रिक वापरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 11:16 IST

आपल्या देशात श्वान पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिटबुल जातीचा श्वान अनेकजण पाळतात. पिटबुल जातीच्या श्वानने आतापर्यंत हल्ला केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. मेरठमधील एक वेगळीच घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : आपल्या देशात कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिटबुल जातीचा श्वान अनेकजण पाळतात. पिटबुल जातीच्या कुत्र्याने आतापर्यंत हल्ला केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. मेरठमधील एक वेगळीच घटना समोर आली आहे. पिटबुल जातीच्या श्वानाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पुढ हे  प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.   

हे प्रकरण मेरठमधील आहे. चोरांनी एका घरातून पिटबुल जातीच्या कुत्र्याची रिक्षातून चोरी केली. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर त्या कुत्र्याने चोरांवर हल्ला केला. या हल्ल्यात ते चोर जखमी झाले. जखमी चोरांनी या कुत्र्याला एका महाविद्यालयाच्या गेटवर सोडून निघून गेले. 

Optical Illusion: फोटोत आधी काय दिसलं यावरून होईल तुमच्या व्यक्तित्वाबाबत खुलासा

महाविद्यालय परिसरात बेवारस पिटबुल श्वानाची माहिती मिळताच अनेकांनी त्यावर दावा केला. या श्वानाची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. अनेकजण येवून तो कुत्रा आपलाच असल्याचे सांगू लागले. कोण त्याला प्रेमाणे बोलवू लागले तर कोण त्याला खायला देवू लागले. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. 

पोलिसांनी दावा करणाऱ्या प्रत्येकाकडे चौकशी केली. पण या कुत्र्याने एकाही व्यक्तीला ओळख दाखवली नाही, त्यामुळे पोलिसांनी या श्वानाला कोणाच्याही ताब्यात दिले नाही. ही बातमी सोशल मीडियावर पसरली. यानंतर हा पिटबुल जातीचा कुत्रा ज्यांचा होता त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळाली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठताच तो कुत्रा च्यांच्याजवळ जावून थांबला.त्यामुळे पोलिसांचीही खात्री पटली. 

'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला

या श्वानाचे मालक सुभाष चौधरी यांनी परिसरात शोधशोध सुरू केली हाती. तो मिळाल्यानंतर ते खुश झाले. हल्ला करणाऱ्या पिटबुल कुत्र्याची चोरी झाल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते, पण या कुत्र्याने स्वत:ची आपली सुटका करुन घेतली.