'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 10:27 AM2022-09-29T10:27:09+5:302022-09-29T10:32:42+5:30

यापूर्वीही अनेक मराठी रॅप टिकटॉक व्हायरल झाले आहेत. परंतु आर्यानं अनोख्या शैलीत अस्सल महाराष्ट्र पेहराव करून या शोमध्ये रॅप गायलं आहे.

Nauvari Rap Viral Video MTV Hustle 2.0 Amravati Girl Aarya Jadhav viral | 'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला

'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला

googlenewsNext

मुंबई - सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी कधी कोण एका रात्रीत प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. कधी कुणाचा डान्स व्हायरल तर कधी कुणाचं गाणं व्हायरल होतं. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्याची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सुरू आहे. हा व्हिडिओ आहे एका मराठी मुलीचा. मराठमोळ्या या मुलीने देशातील अनेक युवकांना वेड लावलं आहे. 

एका ग्लॅमरस स्टेजवर नववारी साडी परिधान करून आलेल्या मुलीने तिच्या रॅप साँगमुळे अनेकांना चाहता बनवलं आहे. MTV वरील Hustle 2.0 या कार्यक्रमात अमरावतीच्या आर्या जाधवनं सर्वांची मने जिंकली आहेत. या मुलीने मराठीत तिचा रॅप सादर केला. यापूर्वीही अनेक मराठी रॅप टिकटॉक व्हायरल झाले आहेत. परंतु आर्यानं अनोख्या शैलीत अस्सल महाराष्ट्र पेहराव करून या शोमध्ये रॅप गायलं आहे. हसल २.० च्या स्टेजवर नववारी साडीत तरुणी येते. मोकळे केस, नाकात नथ आणि चंद्रकोर आणि पायात शूज असा भन्नाट लूक आर्या जाधवनं केला आहे. आर्याच्या परफॉर्मन्सवर केवळ प्रेक्षकच नव्हे तर या शो चे परिक्षकही घायाळ झाले. रॅपमध्ये असलेल्या शब्दांची गुंफण पाहून बादशाहही तिचं कौतुक करू लागला. 

कोण आहे आर्या जाधव?
आर्या जाधव ही महाराष्ट्रातील अमरावतीची मुलगी आहे. कोरोना काळात घरी असताना आर्याने एकेदिवशी रॅप लिहिण्याची कल्पना सुचली. त्यानंतर घरच्या छतावर बसून आर्यानं रॅप लिहियला सुरूवात केली. हळूहळू तिने मोबाईलवर शूट करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरूवात केली. आता रिएलिटी शो Hustle 2.0 मध्ये आर्या स्पर्धक म्हणून उतरली आहे. हा शो देशभरातील नवख्या गायकांसाठी आहे. या शोमध्ये आर्याचं रॅप सॉन्ग ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केले. इतकेच नाही आर्याने या शोमध्ये १० स्पर्धकांना मागे टाकत बाजी मारली. 

Web Title: Nauvari Rap Viral Video MTV Hustle 2.0 Amravati Girl Aarya Jadhav viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.