शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लोकल ट्रेनमधून घोड्याचा प्रवास; फोटो व्हायरल होताच रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:24 IST

photo of horse travelling in local train : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो पश्चिम बंगालमधील  (West Bengal) सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनचा आहे.

कोलकाता : लोकल ट्रेनमध्ये (Local Train) प्रवास करण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो. असातच एका व्यक्तीने आपला घोडा सोबत घेऊन ट्रेनमधून (Horse in the Train) प्रवास केला. आता या व्यक्तीचा आणि त्याच्या घोड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनुसार, ट्रेनमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या कष्टाने लोकांना उभे राहण्यासाठी जागा मिळाली आहे. या गर्दीत एक घोडाही दिसत आहे आणि त्याचा मालक त्याच्या जवळच असल्याचे दिसून येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो पश्चिम बंगालमधील  (West Bengal) सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनचा आहे. बंगालमधील बरुईपूर येथे हा घोडा शर्यतीत (Race) सहभागी होऊन परतत असल्याचे बोलले जात आहे. घोड्यासह ट्रेनमध्ये चढलेल्या व्यक्तीला प्रवाशांनी (Passengers) आक्षेप घेतला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही, असे सांगण्यात येत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दक्षिण 24 परगणामधील बरुईपूर भागात घोड्यांची शर्यत होती. या घोड्याचा मालक त्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानंतर तो आपल्या घोड्याने दक्षिण दुर्गापूर स्थानकात आला. दुसरीकडे, पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्यांनीही असा फोटो मिळाल्याची कबुली दिली आहे, मात्र प्रत्यक्षात असे काही घडले आहे की नाही याची माहिती नाही. सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगितले. 

लोक म्हणाले, 'घोडा दिसला नाही का?'दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. ती व्यक्ती घोड्यासह ट्रेनमध्ये कशी चढली हे समजत नाही. रेल्वे स्थानकावर उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना एवढा मोठा घोडा दिसला नाही का? असे सवाल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वेने प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी वेगळे नियम केले आहेत. प्रवासी डब्यात अशा प्रकारे प्राणी घेऊन जाणे म्हणजे थेट नियमांचे उल्लंघन आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल