शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Video - अरेरे! पाऊस आला पण लग्नातलं जेवण नाही सोडलं; पाहुण्यांचा जुगाड पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:26 IST

Video - ज्यामध्ये लग्नादरम्यान मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाहुण्यांनी जेवण्यासाठी जे केलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे विविध हटके व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. लग्नातील गमती-जमती, नवरा नवरीचे नवनवीन व्हिडीओ हे नेहमीच समोर येत असतात. अशाच एक भन्नाट व्हि़डीओ व्हायरल झाला असून तो पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. लग्न म्हटलं की जेवण आलंच. लग्नाचं जेवण सर्वांनाच आवडतं. काही लोक लग्नाला फक्त जेवायलाच जातात. तुम्ही जर लग्नाला गेला असाल आणि जेवताना मुसळधार पाऊस पडला तर तुमचा मूड बिघडेल आणि खाण्याची मजाही निघून जाईल. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नादरम्यान मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाहुण्यांनी जेवण्यासाठी जे केलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लग्नसमारंभामध्ये पाहुणे जेवायला बसले आहेत. त्याचवेळी जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते. मात्र यावेळी आपल्या जागेवरून उठून न जाता हे पाहुणे तिथे ठेवलेल्या खुर्च्या एका हाताने डोक्यावर पकडून आरामात बसून जेवत आहेत. मुसळधार पावसातही पाहुण्यांनी जेवण सोडले नाही, तर पावसाचा आनंद घेत जेवणाचाही आनंद लुटला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनाही तो खूप आवडत ​​आहे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mr_90s_kidd_ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. है व्हिडीओ आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न