Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आजकाल लोकांना खूपच आवडतात. कारण या फोटोंमुळे लोकांचं चांगला टाइमपास होतो, त्यांचं मनोरंजन होतं आणि सोबतच मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळे बरेच लोक सोशल मीडियावर अनावश्यक गोष्टी बघणं सोडून वेगवेगळे गेम्स, पझल्स, ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं यात वेळ घालवतात. जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
ऑप्टिकल इल्यूजन हे काही आता नवीन आलेली बाब नाही. तुमच्या बालपणीही तुम्ही उलटा-पुलटासारखे फोटो पाहिले असतील. ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला बारकाईने बघून डोकं लावून शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये तुम्हला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन फोटोंमधील फरक दाखवायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यातील वेगळा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोत वेगळा नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर नाराज होण्याचं कारणंही नाहीये. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.