Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच उत्सुकता वाढवणारे असतात. कारण या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही चांगली होते. त्यामुळेच बरेच लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्हीही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. त्यामुळे यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. कधी काही वस्तू, कधी प्राणी तर कधी वेगळे नंबर या फोटोंमध्ये शोधायचे असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 89 हा नंबर दिसत आहेत. पण यात एक वेगळा नंबरही आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे.
महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोटो फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करता येईल. अनेकदा असं होतं की, एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. ते या फोटोबाबत आहे. पण तिच यातील खरी गंमत आहे.
जर तुम्हाला या फोटोतील 89 च्या गर्दीमध्ये वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होऊ नका. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते बघू शकता.
वरच्या फोटोत तुम्ही फोटोत लपलेला वेगळा नंबर बघू शकता.