शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वरकरणी दिसतात पांढऱ्या अन् काळ्या रंगाचे चौकोन पण नीट पाहताच सर्वांचा रंग सेम टु सेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:32 IST

सध्या तुमच्यासमोर असणारा फोटोदेखील अशाच प्रकारचा आहे. प्रथमदर्शनी वाटत नसलं, तरी यामधील A आणि B हे दोन चौरस एकाच रंगाचे आहेत.

ऑप्टिकल इल्युजन या प्रकारचे फोटो तुम्हाला माहिती असतील. पहिल्यांदा पाहिल्यानंतर यात जी गोष्ट दिसते, ती तशी नसून वेगळीच आहे हे नंतर आपल्या लक्षात येतं. कोडी म्हणून किंवा मनोरंजनासाठी अशा प्रकारची चित्रं तयार केली जातात. इंटरनेटवर ही चित्रं  प्रचंड व्हायरल होत असतात. या चित्रांमधील वेगळ्या गोष्टीची उकल झाल्यानंतर कित्येक जण ‘अरेच्चा हे आपण पाहिलं कसं नाही’ अशी प्रतिक्रिया देतात. सध्या तुमच्यासमोर असणारा फोटोदेखील अशाच प्रकारचा आहे. प्रथमदर्शनी वाटत नसलं, तरी यामधील A आणि B हे दोन चौरस एकाच रंगाचे आहेत.

या चित्रामध्ये बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे एक बेस  दिला आहे, ज्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे काही चौरस आहेत. या बेसवरच आणखी एक वस्तूही आहे, जिची सावली यामधील काही चौरसांवर पडली आहे. यातील दोन चौरसांना A आणि B अशी नावं दिली आहेत. तसेच, हे दोन्ही चौरस एकाच रंगाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, की हे दोन्ही चौरस वेगवेगळ्या रंगाचे आहेत, तर तुम्ही चुकीचे आहात. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन एडवर्ड एच. अ‍ॅडेलसन यांनी 1995 मध्ये तयार केलं होतं. एमआयटीच्या ब्रेन अँड कॉग्निटिव्ह विभागातील पर्सेप्च्युअल सायन्स ग्रुपच्या वेबसाईटवर हे अपलोड करण्यात आले होते. यामधील चौरस हे काळे-पांढरे नसून, करड्या रंगाच्याच वेगवेगळ्या शेड्स (Grey squares optical illusion) आहेत. पहिल्यांदा पाहिल्यानंतर कित्येकांना यातील A चौरस हा गडद करड्या रंगाचा, तर B चौरस हा हलका करड्या रंगाचा असल्याचा भास होतो. मात्र हे एकाच रंगाचे असल्याचा पुरावा देखील पुढे देण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया