Operation Sindoor : भारतीय सैन्याने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा असा बदला घेतला, ज्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली. मंगळवारी मध्यरात्री भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले अन् पाकिस्तानी नागरिकांची पळता भुई थोडी झाली. या हल्ल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहे, ज्यात भारताची क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विविध भागात पडताना दिसत आहेत. अशातच, सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अँकरचा व्हिडिओही व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती अँकर भारताच्या हल्ल्यामुळे ढसाढसा रडताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहा
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @Incognito_qfs नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत पाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर पोस्टवरील लोकांच्या कमेंट्सही खूप मजेशीर आहेत. एका युजरने म्हटले की, या महिलेने पाकिस्तानी मालिकांमध्ये काम करायला हवे. दुसऱ्याने लिहिले, किती नाटकं करणार...(हा व्हायरल व्हिडिओ आहे, लोकमत या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)
ऑपरेशन सिंदूर गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती. त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. या दहशतवादी हल्ल्याच्या बरोबर 15 दिवसांनंतर, आपल्या तिन्ही सैन्याने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी छावण्यांवर सर्वात मोठा प्रहार केला. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 महत्त्वाच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ही लपण्याची ठिकाणे जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जात होते. या कारवाईत सुमारे शंभर दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.