शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : आधार कार्ड असेल तरच लग्नात जेवण, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 08:23 IST

नेटकऱ्यांकडून २१ तोफांची सलामी

अमरोहा : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात एका विवाहसमारंभात अनोखा प्रकार घडला. लग्नानंतर आयोजित मेजवानीत वराकडून आलेल्या पाहुण्यांसाठी वधूकडील लोकांनी वेगळेच फर्मान काढले. आधार कार्ड असेल त्यांनाच जेवणाची परवानगी देण्यात आली. मात्र आधार कार्ड नसल्याने अनेक पाहुणे जेवण न करताच रागावून परतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी हसनपूर येथील एका वस्तीत दोन लग्नांचे आयोजन होते. त्यामुळे लग्नाच्या दोन वराती परिसरात आल्या होत्या. एका लग्नात जेवणाचा कार्यक्रम लवकर सुरू झाला. दुसऱ्या लग्नासाठी आलेले काही पाहुणेही त्याच मेजवानीत सामील झाले आणि जेवणावर तुटून पडले. पाहुण्यांची इतकी जास्त संख्या पाहून नवरीकडील लोक चिंताग्रस्त झाले, थोड्याच वेळात जेवण बंद केले.  सर्व पाहुण्यांना मंडपाच्या बाहेर काढण्यात आले. मग आधार कार्ड असलेल्यांनाच प्रवेश मिळेल अशी अट ठेवण्यात आली. मात्र, या अटीमुळे लग्नातील खरे पाहुणेही ओळखीचा पुरावा नसल्यामुळे अडचणीत आले होते. त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती; पण काही समजूतदार लोकांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले आणि अखेर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले. 

नेटकऱ्यांकडून २१ तोफांची सलामी! या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेटकरीही भारताच्या इतिहासातील अशी पहिली लग्नाची वरात असेल... वाह-वाह हसनपूरवासीयांच्या अशा आदरातिथ्याबद्दल २१ तोफांची सलामी अशा अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल