शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

Dubai Lottery: कार धुता धुता नशीब चमकले! रिक्षा चालकाचा मुलगा 21 कोटींची लॉटरी जिंकला, भावासाठी भावूक झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 18:16 IST

काही दिवसांपूर्वी केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली होती. भरत पुन्हा दुबईला जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी करणार आहे.

काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाला करोडो रुपयांची लॉटरी लागल्याचे वृत्त आले होते. अधून मधून आखाती देशांमधून भारतीय नागरिक लॉटऱ्या जिंकल्याच्या बातम्या येत असतात. आता नेपाळी नागरिकाने दुबईत लॉटरी जिंकली आहे. महत्वाचे म्हणजे कार धुता धुता त्याचे नशीब चमकले आहे. 

दुबईत भरत हा ३१ वर्षीय तरुण महजूज ड्रॉमध्ये २१ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. भरत हा दुबईत करोडपतींच्या कार धुण्याचे काम करत होता. गेल्या तीन वर्षांपासून तो दुबईत आहे. त्याचे वडील भारतात रिक्षा चालवितात. त्याचा भाऊ लकवाग्रस्त असून त्याच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, त्याच्या उपचारासाठी बक्षीसाची रक्कम खर्च करणार असल्याचे भरत म्हणाला. 

भरतच्या भावाला ब्रेन ट्युमर झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतू, यानंतर त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीर पूर्णपणे लकवाग्रस्त झाले. त्याच्या उपचाराच्या खर्चासाठी भरत दुबईला गेला होता. तिथे तो लोकांच्या कार धुवून मिळालेल्या पैशांतून भावासाठी उपचाराची सोय करत होता. भरतला दोन मुलेही आहेत. भरतसोबत त्याच्या दोन मित्रांनी मिळून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. एवढी मोठी लॉटरी जिंकणारा भरत पहिला नेपाळी ठरला आहे. भरत २७ सप्टेंबरला नेपाळला परतणार आहे. यानंतर पुन्हा तो दुबईला जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी करणार आहे. जॅकपॉट जिंकल्यानंतर त्याने कार धुण्याचे काम सोडणार की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

काही दिवसांपूर्वी केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली होती. थोडी थोडकी नाही तर थेट २५ कोटींची लॉटरी या रिक्षा चालकाला लागली होती. ओनम सणामध्ये ओनम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला आहे. ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्याने एक दिवस आधीच तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला होता. या रकमेपैकी त्याला १० कोटी रुपये सरकारला कराच्या स्वरुपात देणे भाग होते.  

टॅग्स :Dubaiदुबई