शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Nagin Dance in Wedding Viral Video: भन्नाट नागिन डान्स! नवरदेवाच्याच घोडीवर चढून मित्राने घातला धुमाकूळ; भले भले डान्समास्टरही लावतील डोक्याला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:40 IST

लग्नाच्या वरातीत 'नागिन डान्स' हवाच, असं म्हणणाऱ्यांनी पाहायलाच हवा व्हिडीओ

Nagin Dance in Wedding Viral Video: भारतात लग्न असलं की मित्रांना खूपच महत्त्व असतं. मित्रांशिवाय नवरदेवाला लग्न अपूर्ण वाटतं असं म्हटलं तरीही फारसं वावगं ठरणार नाही. त्यातही वऱ्हाडी आणि वरातीत नाचणारे मित्रमंडळी यांना तर एक विशेष स्थान असतं. कारण हेच लोक लग्नात जमतात आणि मौज मजा करून साऱ्यांचाच थकवा अन् ताण घालवतात. सध्या अशाच एका मित्राचा व्हिडीओ (marriage viral video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो. या व्हिडिओतील मित्र नवरदेवाच्या घोडी चढून नागिन डान्स (Nagin dance) करतोय. इतकंच नव्हे तर तो घोडीवर बसल्या बसल्या सर्कसमधील कसरतींसारखा डान्स करतोय, जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल.

लग्नाच्या वरातीत अनेक लोक नागिन डान्स करताना दिसतात. बरेच लोक नाचण्यात इतके मग्न होतात की ते डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचतात. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मित्र घोडीवर बसून नागिन डान्स करत आहे. नवरदेवही याच घोडीवर बसलेला आहे. अशा परिस्थितीतही तो मित्र घोडीवर बसून कलाबाजी दाखवत भाव खाऊन जाताना दिसतोय. पाहा व्हिडीओ-

नवरदेवाची वरात सुरू असताना नाचणारा एक मित्र अचानक उडी मारून वराच्या घोडीवर बसतो आणि नागिन डान्स सुरू करतो. आश्‍चर्य म्हणजे त्या वेळी नवरदेवही घोडीवर मागे बसलेला असतो. नवरदेवाच्या तोंडात दाबलेले पैसेदेखील हा कलाकार हळूवारपणे काढून घेताना दिसतो आणि आनंदाने नाचतानाही दिसतो.

हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'मित्राच्या नागिन डान्सने आग लावली...!' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलंय की, 'या नागिन डान्सने फिजिक्सचे सगळे नियम चुकीचे असल्याचं सिद्ध केलं.' दरम्यान हा मजेदार व्हिडिओ Godman Chikna हा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हि़डीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाdanceनृत्यSocial Viralसोशल व्हायरल