मुंबईच्या टी२० क्रिकेट लीगमध्ये ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टला नॉर्थ मुंबई पँथर्सकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी सूर्या कुमारने मैदानातील चाहत्यांची मन जिंकली. सामन्यापूर्वी एका चिमुकल्या चाहत्याने सूर्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सूर्यानेही चिमुकल्या चाहत्यासोबत फोटो काढला. सूर्याने त्याच्या इंस्टा स्टोरीवर हा फोटो शेअर केला.
मुंबईच्या टी२० क्रिकेट लीगमध्ये सूर्यकुमार यादवच्या संघ ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टचा नॉर्थ मुंबई पँथर्सकडून ३८ धावांनी पराभव झाला. या सामन्यात पृथ्वी शॉने नॉर्थ मुंबई पँथर्सकडून जबरदस्त फलंदाजी केली. शॉने अवघ्या ३४ चेंडूत ७५ धावा केल्या, ज्यात तीन षटकार आणि १२ चौकारांचा समावेश आहे. नॉर्थ मुंबई पँथर्सने प्रथम खेळताना ६ विकेट्स बाद २०७ धावा केल्या. त्यानंतर ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट १९.५ षटकांत फक्त १६९ धावाच करू शकला. ज्यामुळे पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील संघ नॉर्थ मुंबई पँथर्स उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला.
मुंबई टी-२० लीगमध्ये वांद्रे ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, सोबो मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स या संघांनी उपांत्य फेरी गाठली. पहिला उपांत्य सामना ईगल ठाणे स्ट्रायकर्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात १० जून २०२५ रोजी खेळला जाईल. तर, दुसरा उपांत्य सामना सोबो मुंबई विरुद्ध फाल्कन्स वांद्रे ब्लास्टर्स यांच्यात १० जून रोजीच खेळला जाईल. अंतिम सामना १२ जून रोजी खेळला जाईल.