शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई लोकल आणि बरंच काही... व्हायरल 'Video' चा इंटरनेटवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 16:03 IST

मुंबईच्या लोकलमध्ये प्रात: काली केलेली भजनं असो किंवा महिला डब्यातील गरबा असो याचे व्हायरल व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच.

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण काही नवं नाही. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीतून वाट काढत प्रत्येकजण आपल्या कामचं ठिकाण गाठतो. मुंबईची जीवनवाहिनी लोकलचं हे एवढंच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण सध्या मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधल आहे. 

याआधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधील डान्सचे किंवा थरारक दृश्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण अलीकडेच ट्रेनमधील वादक मंडळींच्या या व्हिडीओने लोकल प्रवाशांच्या भावनांच्या तारा छेडल्या आहेत. या बाजेवाल्यांनी  दिवसभराच्या कामाच्या व्यापातून लोकल प्रवाशांची सूटका केली. थकल्या-भागल्या शरीराला यानिमित्ताने आराम देण्याचं काम त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये, काही बॅंजो वादक मंडळी त्यांची ऑर्डर वाजवून घरी जात असताना त्यांनी लोकल ट्रेनच्या प्रवासात चार चांद लावले. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये या बाजेवाल्यांनी वाजवायला सुरुवात केली. मग काय चक्क लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी ताशाच्या तालावर ठेका धरला. या वादकांच्या अप्रतिम वादनाने ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाच्या तोंडावर हसू खुलल्याचं दिसतंय. ताशाच्या आवाजात  तल्लीन होत लोकल ट्रेनमधील प्रत्येक प्रवासी नाचताना दिसतोय. 

पाहा व्हिडीओ- 

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय. मुंबईकरांचा हा अनोखा अंदाज पाहून लोकांनी भरभरुन कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया