Nita Ambani Rapid Fire, PM Modi Mukesh Ambani : नीता अंबानी हे नाव प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील त्या महत्त्वाच्या सदस्य आहेत. जागतिक किर्तीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांना व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पद्धतीने नीता अंबानी गेली अनेक वर्षे सहाय्य करत आहेत आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या आहेत. अंबानी कुटुंबाची सून असण्याबरोबर त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षादेखील आहेत. नुकत्याच त्या हार्वर्ड कॉन्फरन्स २०२५ ( Harvard Conference 2025 ) या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यावेळचा त्यांचा एका उत्तराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हार्वर्ड कॉन्फरन्स २०२५ मध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरेही दिली. या मुलाखतीत त्यांनी रॅपिड फायर पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्यांनी झटपट उत्तरे दिली. या रॅपिड फायरमध्ये त्यांना दोन पर्यायापैकी एक उत्तर निवडण्यास सांगण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले. या प्रश्नावर त्यांनी अजिबात वेळ न दवडता उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भारत देशासाठी सर्वोत्तम आहेत, तर माझे पती मुकेश अंबानी हे आमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आहेत.
नीता अंबानी यांच्या या उत्तराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रॅपिड फायरचा हा राऊंड इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत आणि त्यांच्या समयसूचकतेबाबत त्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत.