शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आईला पॅरेलिसिस, बापाचेही झाले निधन; अंत्यसंस्कारासाठी दोन्हीही मुले आली नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:25 IST

२ वर्षापूर्वी शहीद भगत सिंह सेवा दलाचे जितेंद्र सिंह शंटी यांची मुलाखत घेतली होती. ते सामाजिक कार्यकर्ता आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पगडी घातलेला एक सरदार सांगतो की, दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. पत्नीला पॅरेलिसिस झालाय. पती तिची सेवा करतो. परंतु एकेदिवशी सकाळी पती तिला दिसत नाही. तिला स्वत:ला उठता येत नाही. त्यानंतर पती दुसऱ्या बेडवर मृत पडल्याचे तिला दिसते. पती या अवस्थेत असतानाही तिला जागेवरून उठवण्याची ताकद नसते. 

खूप लांब एक फोन असतो, ३-४ तास रेंगाळत ती तिथे पोहचते. फोन लावते पण बोलू शकत नव्हती. शहीद भगत सिंह सेवा दलाचा फोन येतो. त्यानंतर काही स्वयंसेवक घरी येतात. परंतु पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन होते. अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना फोन केला जातो. परंतु ते आम्हाला यायला खूप वेळ होईल तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगतात हे सर्व सांगताना सरदारचा कंठ दाटून येतो. काहीवेळ शांत बसल्यानंतर पुढे म्हणतात, मृत्यूनंतर आई वडिलांना खांदा द्यायला अनेकजण पुढे आले. परंतु ज्यांना त्यांनी जन्म दिला तेच खांदे नव्हते. हा व्हिडिओ २ वर्षापूर्वी शूट केलेल्या एका मुलाखतीचा भाग आहे. हा पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. 

दिलीप कुमार सांगतात की, हे कटू सत्य आहे बहुतांश आई वडिलांचे. ज्यांनी त्यांचे आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी घालवले. तर कसली मुले आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांचे अंत्यदर्शनही घ्यायचे नाही. यापेक्षा मुले नसलेली चांगली असं यूजर्स उत्कर्ष गुप्ता यांनी लिहिलं. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून मुलांच्या संवेदना मेल्यात, अतिशय दु:खद अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

२ वर्षापूर्वी शहीद भगत सिंह सेवा दलाचे जितेंद्र सिंह शंटी यांची मुलाखत घेतली होती. ते सामाजिक कार्यकर्ता आहेत. गरजूंसाठी सेवा देणे हे त्यांचे ध्येय आहे. ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. मी पैसेवाल्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाहीत. ते आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आले असते तरीही मोठी गोष्ट होती. ज्यांची मुले अमेरिका, कॅनडासारख्या देशात आहेत ते शंटी यांना फोन करून आम्ही येऊ शकत नाही तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगतात. 

मुलाखतीत रिचा अनिरुद्ध विचारते की, तुम्हाला राग येत नाही? शंटी म्हणतात की, मला राग आला तरी काय करणार पण मला सल्ले मिळतात की ज्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो ते आपल्यासाठी काय करत आहेत. आई, बाप देह मारून, मन मारून... बाप घरी सामान आणतो तेव्हा खिशात पैसे नसतात.  कुठूनतरी उधारीवर आणतो. पण कुठूनही आणतो आणि मुलाची फी भरतो. पण जेव्हा ते वडील वारतात आणि मुलं सेटल होतात तेव्हा ते अंत्यसंस्कार करायलाही येत नाहीत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल