चीनमधून नेहमीच लग्नातील फसवणुकीच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पाच मुलांच्या आईने काही तरूणांना फसवून लाखो रूपये कमाई केली. या महिलेचा कारनामा एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल असाच आहे. महिलेने हुशारी दाखवत ३६ लाख रूपये लुटले. यासाठी ती तरूणांना सोशल मीडियावरून तिच्याकडे आकर्षित करत होती. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तर तिची कहाणी वाचून लोक अवाक् झाले आहेत.
महिलेने तरूणांना लुटण्यासाठी 'फ्लॅश मॅरेज'चा आधार घेतला. ज्यात ती तरूणांसोबत लगेच लग्न करत होती आणि नंतर त्यांना सोडत होती. महिलेने पहिल्या तरूणासोबत लग्न केलं आणि त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावत त्याला सोडलं. लग्नादरम्यान तिला मिळालेले पैसेही तिने परत केले नाहीत. त्यानंतर एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दुसऱ्या तरूणाला फसवलं आणि त्याच्याशीही लग्न केलं. काही दिवसांनी तिने तिसऱ्या तरूणाला फसवलं आणि सोडलं. त्याचेही पैसे घेऊन फरार झाली.
तीन महिन्यात लुटले ३६ लाख रूपये
धक्कादायक बाब म्हणजे महिलेने तीन महिन्यात 300,000 युआन म्हणजे भारतीय करन्सीनुसार ३६ लाख रूपये वसूल केले. हे सगळं तिने ब्लाइंड डेटिंग अॅप्सच्या मदतीने केलं. महिलेने तरूणांची फसवणूक करण्यास डिसेंबरमध्ये सुरूवात करत होती. लग्नात मिळाणारे ब्राइड मनीही परतही करत नव्हती. असं करत तिने आणखी दोन तरूणांना फसवलं.
महिला तिसऱ्या लग्नावेळी अडचणीत आली. कारण यावेळी पीडित तरूणाने पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, महिलेला आधीच पाच मुलं आहेत आणि अशाप्रकारे लग्न करूनच ती पैसे कमावते. अशा लग्नाला चीनमध्ये फ्लॅश मॅरेज म्हटलं जातं. ज्यात महिला लग्नाच्या नावावर तरूणांना फसवतात. त्यांच्याकडे पैसे घेते आणि नंतर फरार होते. अनेकदा तरूणांवर घटस्फोटाचा दबावही टाकते. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.