शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तिचं मायेचं छत्र! भर पावसात लेकरांसाठी लढत उभी राहिली माऊली, Video पाहून डोळ्यात येईल पाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:01 IST

भर पावसात आपल्या लेकरांसाठी मायेच छत्र उभं करणाऱ्या एका माऊलीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Social Viral : 'आ' म्हणजे 'आत्मा' आणि 'ई' म्हणजे 'ईश्वर' या दोन शब्दांचा संगम म्हणजे 'आई'. हा दोन अक्षरी शब्द जणू वात्सल्य, प्रेमाचं प्रतिक. या जगात आई आणि मुलांचं नातं अगदी गर्भापासून सुरू होतं. निर्स्वार्थी प्रेमाची परिभाषा सांगणारं हे गोड नातं आहे.  ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांवर प्रेम करते त्याची तुलनाच करता येणार नाही. प्रसंगी ती संकटासमोर धीटपणे उभी राहून आपल्या लेकरांचं रक्षण करते. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल. 

 भर पावसात आपल्या लेकरांसाठी मायेच छत्र उभं करणाऱ्या एका माऊलीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये राज्यासह देशातील काही भागांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. त्याचाच फटका या बेघर कुटुंबाला बसला. अशा परिस्थितीत पोटच्या लेकींसाठी ही माय ढाल बनून पावसाचा सामना करताना दिसते आहे. मुसळधार पावसामध्ये ही आई ताडपत्री पकडून ठाम उभी आहे. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये धो-धो कोसळणाऱ्या पावसात ही आई आपल्या मुलींचं पावसापासून संरक्षण करत आहे. स्वत: पावसाच्या धारा अंगावर झेलत या आईने तिच्या लेकरांसाठी मायेच छत्र उभारलं आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील. तर व्हिडिओ पाहिलेले काही नेटकरी भावूक झाले आहेत. अलिकडेच देशात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी भागांना चांगलच झोडपलं. त्या परिस्थितीत ही महिला जीवाचं रान करत तिच्या लेकींना भिजण्यापासून वाचवताना दिसतेय.

kusum motivation नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया यूजर्सच्या भावनांच्या तारा छेडल्या आहेत. या व्हिडिओमुळे अनेकांना आपल्या जन्मदात्या आईची आठवण झाली असं कमेंटच्या माध्यमातून समजतंय. 

"आईपेक्षा मोठा योद्धा या जगात नाही" अशी कमेंट करत या यूजरने व्हायरल  व्हिडिओकडे अनेकाचं लक्ष वेधलं आहे. त्यानंतर आणखी एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे , "या मातेला शतश: प्रणाम" अशी कमेंट त्याने केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया