शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

माकडचेष्टा नाही! माकड चक्क पतंग उडवतेय ते ही अगदी माणसाप्रमाणे, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:41 IST

पतंग उडवण्याचा आनंद फक्त माणसांनेच नाही, तर माकडांनेही तितक्याच उत्साहाने घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ (Video of Monkey Flying Kite) चांगलाच व्हायरल होत आहे. यात हे माकड पतंग उडवताना दिसत आहे.

संपूर्ण देशभरात १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण अतिशय आनंदात साजरा केला गेला. संक्रांतीच्या दिवशी गुजरात आणि राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये पतंग उडवण्याची परंपरा आहे. मात्र, पतंग उडवण्याचा आनंद फक्त माणसांनेच नाही, तर माकडांनेही तितक्याच उत्साहाने घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ (Video of Monkey Flying Kite) चांगलाच व्हायरल होत आहे. यात हे माकड पतंग उडवताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माकड छतावरील टाकीवर बसलं आहे आणि हातात मांजा पकडून पतंग उडवत आहे. व्हिडिओमध्ये माकड मांजा ओढून आरामात पतंग उडवताना दिसतं. ते पतंग उडवण्याची मजा घेत आहे. आकाशात अनेक पतंग उडताना व्हिडिओमध्ये दिसतात. हे पाहून माकडानेही पतंग उडवायला सुरुवात केली. नंतर त्याने पतंग आपल्याकडे खेचली आणि ती फाडून टाकली.

हा व्हिडिओ ट्विटरवर @anilsaini2004 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिण्यात आलं, मकर संक्रांतीच्या निमित्नाने जयपूरमध्ये पतंग उडवण्याची पद्धत अशी आहे, की इथे माकडेही पतंग उडवतात. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.

एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, माकडाचा हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, की माकडही अशा पद्धतीने पतंग उडवू शकतं. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMonkeyमाकड