शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

या चिमुकलीचा वेटलिफ्टिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल, मीराबाई चानूचंही जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:32 IST

अनेकजण आता ऑलिम्पिकमध्ये मीराबाईसारखं यश प्राप्त करण्याची स्वप्न पाहु लागले आहेत. मात्र आता एका छोट्या मीरा बाई चानूनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक (India won Silver at Tokyo) मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) अनेकांची प्रेरणा बनली आहे. अनेकजण आता ऑलिम्पिकमध्ये मीराबाईसारखं यश प्राप्त करण्याची स्वप्न पाहु लागले आहेत. मात्र आता एका छोट्या मीरा बाई चानूनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ही चिमुकली व्हिडिओत मीराबाई चानू प्रमाणं वेटलिफ्टिंग करत जणू तिला अभिवादानच करत आहे. 

या  व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही चिमुकली वेटलिफ्टिंग (Weightlifting Video) करत आहे, तर तिच्या मागे असणाऱ्या टीव्हीवर मीराबाई चानू ऑल्मिपिकमध्ये मेडल जिंकताना दिसतं आहे. जसं मीराबाई वेटलिफ्टिंग करते तशी ही चिमुकलीही वेट लिफ्टिंग करते. नंतर जिंकल्यावर ज्याप्रमाणे मीराबाई सर्वांना अभिवादन करते त्याचप्रमाणे ही मुलगीही अभिवादन करताना दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांची मुलगी आहे. त्यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. सतीश यांनी वेटलिफ्टिंगमध्ये याआधीच भारताची मान उंचावली आहे. त्यांनी मुलीचा हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत लिहिलं, ज्युनिअर @mirabai_chanu. याला प्रेरणा म्हणतात.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. एका यूजरनं म्हटलं, की खरंच मीराबाई चानू आपल्या देशाचा अभिमान आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की किती लहान मुलगी मीराबाई बनवण्याची स्वप्न पाहत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. इतरही अनेकांनी यावर कमेंट करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 60 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. मीराबाई चानूनंही व्हिडिओ शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिलं. ती म्हणाली, सो क्युट लव्ह दिस.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल