शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video:लग्नात नाचताना महिलेवरुन दोघांमध्ये झाली तुफान हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:54 IST

सध्या मात्र लग्नातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या लग्नादरम्यानच नाचणारे नातेवाईक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं.

भारतीय विवाहसोहळे रंग, परंपरा, प्रेम, संगीत अशा विविध गोष्टींनी परिपूर्ण असतात. लग्नाचा दिवस कुटुंब आणि पाहुण्यांसाठी खरोखर आनंददायी असतो. आनंदाच्या प्रसंगी केवळ कुटुंबातील सदस्यच नाही तर मित्रमंडळी देखील पार्टीत सहभागी होतात. कोणत्याही लग्नात डान्स नसेल तर मजा येत नाही, असं म्हटलं जातं. लग्नात मोकळेपणाने डान्स करायला सर्वांनाच आवडतं. भारतात दररोज शेकडो विवाहसोहळे होतात आणि सोशल मीडियावर याचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Indian Wedding Videos) होत राहततात. सध्या मात्र लग्नातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या लग्नादरम्यानच नाचणारे नातेवाईक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं (Fight Between Guest During Wedding Function).

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, लग्नाच्या निमित्ताने स्टेजवर नवरी आणि नवरदेव बसलेले आहेत आणि समोरील डीजे फ्लोअरवर नातेवाईक उत्साहात नाचत आहेत. त्यानंतर अशी काही घटना घडते की, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचतं. डान्स करतानाच दोन तरुण एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं. काही युवक डान्स फ्लोअरवर नाचत असतानाच ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ YouTube वर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत २.२ मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की या लग्नातील बहुतेक पाहुणे एकतर डान्स करत आहेत किंवा काहीतरी खात-पित आहेत. यादरम्यान एक जोडपं सोबत डान्स करण्यासाठी फ्लोअरवर येतं. मात्र या युवकाने महिलेसोबत डान्स करण्यासाठी तिचा हात पकडला आणि तिला ओढून डान्स फ्लोअरवर आणलं. यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली. ती म्हणजे या नादात त्याचा धक्का शेजारी उभा असलेल्या एका दुसऱ्या युवकाला लागला.

यानंतर धक्का लागल्याने हा युवक भडकला आणि स्टेजवर आलेल्या व्यक्तीला जोरात पकडून उचलू लागला. काहीच वेळात तो वाद घालू लागला आणि मारहाणही करू लागला. भांडण सुरू होताच लगेचच डिजे बंद करण्यात आला आणि सगळे हे प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न करू लागले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब