शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video - वर्दीतील माणुसकी! रस्त्यावर पडली वृद्धाची डाळ; पोलिसांनी हाताने गोळा करून केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:07 IST

एका गरीब वृद्धाला मदत करताना पोलिसांनी रस्त्यावर पडलेली डाळ गोळा केली आणि नंतर त्याला सुखरूप घरी सोडलं.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पोलिसांचा हळवा चेहरा समोर आला आहे. एका गरीब वृद्धाला मदत करताना पोलिसांनी रस्त्यावर पडलेली डाळ गोळा केली आणि नंतर त्याला सुखरूप घरी सोडलं. पोलिसांचे हे काम पाहून लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचं लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी मेरठमधील परतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील उड्डाणपुलाजवळ एक वृद्ध व्यक्ती बाईकवरून डाळ घेऊन जात होता. अचानक त्या वृद्धाला चक्कर आली आणि काही वेळातच त्याच्या बाईकचा तोल बिघडला आणि तो खाली पडला. बाईक पडताच डाळीने भरलेलं पोतं खाली पडलं. त्यानंतरती डाळ रस्त्याच्या मधोमध सांडली. 

वृद्धाने यानंतर डोक्यावर बांधलेला टॉवेल काढला आणि त्यातून डाळ गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, उड्डाणपुलाजवळ पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. इन्स्पेक्टर रामफल सिंहही तिथे ड्युटीवर होते. एक वृद्ध व्यक्ती पडलेली डाळा गोळा करत असल्याचं पोलिसांना दिसताच पोलीसही तेथे पोहोचले. पोलिसांनी वृद्धाची बाईक उचलली आणि ती लावली. यानंतर स्वत: वृद्धासोबत रस्त्यावर बसून सर्व डाळ जमा केली. 

रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये आणि कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दोन पोलिसांनी लाठ्या-काठ्या घेऊन सर्कल केलं. इन्स्पेक्टर आणि इतर पोलिसांनी पिशवीत भरली. पोलीस कर्मचारी डाळ गोळा करत असताना, त्याचवेळी तेथून जाणाऱ्या लोकांनी हे दृश्य पाहिले आणि त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Policeपोलिस